शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी न्यायाधीशाची पौरुषत्व चाचणी

By admin | Updated: April 29, 2015 01:18 IST

माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय ३५, रा. आंबेगाव पठार) याची पौरुषत्व (पोटेन्सी) चाचणी करण्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी परवानगी दिली.

पुणे : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय ३५, रा. आंबेगाव पठार) याची पौरुषत्व (पोटेन्सी) चाचणी करण्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी परवानगी दिली.शिंदे व फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे होते. त्यामुळे येणे-जाणे होते. नागराजची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली असल्याने तो घरी एकटाच असल्याने पीडित मुलगी किंवा तिचा भाऊ आरोपीला जेवण घेऊन जात असत. नागराज राहत असलेल्या इमारतीतील मुले, पीडित मुलगी व तिचा भाऊ त्याच्या घरी कॅरम, बुद्धिबळ खेळण्यासाठी जात असत. दरम्यान, तो तिच्याशी लगट करू लागला. त्यानंतर तिला तिचे शिक्षण चांगल्या ठिकाणी करून देण्याचे सांगून एमपीएससीचे व यूपीएससीचे क्लास लावण्याचे आमिष त्याने दाखविले. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले व २६ जून २०१४ रोजी दुपारच्या वेळी नागराजने तिच्यावर बलात्कार केला. ही गोष्ट कोणास सांगितल्यास माझ्याकडे बंदूक असून मारून टाकू, अशी तिला धमकी दिली. तसेच बोलावल्यावर तू आली नाहीस तर घरी सर्व प्रकार सांगण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितल्याने हे प्रकरण उघडकीस आले. गुन्ह्याचा तपास बाकी असल्याने व वैद्यकीय चाचणी बाकी असल्यामुळे त्याची पोटेन्सी टेस्ट करण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. लीना पाठक यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने पोटेन्सी टेस्टला परवानगी दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)४सर्वोच्च न्यायालयाने शिंदे याचा जामीन फेटाळून १० नोव्हेंबरपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्याने अपघात झाल्याची माहिती दिली होती. ४१९ नोव्हेंबर २०१४ रोजी शिंदेची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्याच्या हाडांना इजा झालेली नसून किरकोळ जखमा आहेत; त्यासाठी मलमपट्टीची आवश्यकता असल्याचा अहवाल ससूनच्या शल्यचिकित्सा विभागाने न्यायालयात सादर केला होता. ४२७ नोव्हेंबरपर्यंत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नव्हता. त्यातच पोलीस कोठडीची मुदतही संपली होती. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी नागराज शिंदेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.