शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नोटांपुढे सगळे विषय बासनात

By admin | Updated: November 15, 2016 03:58 IST

केंद्र सरकारच्या १ हजार व ५००च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नोटांच्या टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेणे

पुणे : केंद्र सरकारच्या १ हजार व ५००च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नोटांच्या टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेणे किंवा एटीएम सेंटरमधून नोटा मिळविणे, याच एका उद्योगात बहुतेकांचा वेळ जात असून त्यामुळे विविध कारणांनी निघणारे मोर्चे तर थंडावलेच; पण विधान परिषद व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय चर्चाही थांबली आहे. उमेदवारी हेच ‘लक्ष्य’ ठरविलेल्यांचे ‘लक्ष’ही आता नव्या नोटा कशा मिळवायच्या याकडेच लागले आहे. नव्या नोटांची उपलब्धता हाच सध्याचा सार्वत्रिक विषय झाला आहे. बँका तसेच एटीएम समोरच्या रांगांचा कानोसा घेतला असता, त्यांच्या चर्चांमधूनही निवडणुकांचा मुद्दा बाजूला पडला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भल्यामोठ्या संख्येने निघणारे मराठी क्रांती मूक मोर्चे तसेच त्यावरची प्रतिक्रिया म्हणून निघणारे बहुजन क्रांती मूक मोर्चे हाच सर्वाधिक चर्चेचा विषय होता. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीवरील चर्चेेने जोर धरला. दरम्यान महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचीही मोर्चेबांधणी सुरू झाली. नव्याने झालेली प्रभागरचना, कोणाला उमेदवारी मिळेल, कोणाची सत्ता येणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता नोटांच्या चर्चांनी त्यावर मात केली आहे.चर्चेचा कोणताही विषय नोटांच्या विषयावरच येऊन पोहोचू लागला आहे. मंगळवारी (दि. ८) हा निर्णय जाहीर झाल्यानंतर एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल, असा नागरिकांना विश्वास होता. मात्र, आता आठवडा होत आला तरीही नव्या नोटा मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. नव्या नोटांचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमधील नाराजी कायम आहे. (प्रतिनिधी)