रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) येथे कोरोना आढावा बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. या वेळी शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार,माजी आमदार पोपटराव गावडे,आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर,विश्वास कोहकडे,राजेंद्र गावडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, दत्तात्रय पाचुंदकर आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गृहमंत्री वळसे पाटील यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे आढावा घेऊन आरोग्य विभागासह महसूल व पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी सरकारने लागू केलेल्या निर्बंधामुळे नागरिक व व्यावसायिकांनी शिस्त पाळावी, स्थलांतरित व्यक्तीमुळे संसर्ग वाढतो, नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण करून घेण्याचे आवाहन ही वळसे पाटील यांनी केले. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन व रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात व वेळेवर उपलब्ध व्हावे, तसेच ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर चालू करावेत अशी मागणी अशोक पवार यांनी बैठकीत केली, तर पाबळ आणि मलठण येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची मागणी मानसिंग पाचुंदकर यांनी या वेळी केली. त्याला अनुसरून वळसे पाटील यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. या वेळी कोरोना चाचण्या, लसीकरण, तालुक्यातील बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता आणि कोरोनाची साखळी तोडण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा गृहमंत्री वळसे पाटील यांनी घेतला. तर, बैठकीनंतर वळसे पाटील यांनी रांजणगाव एमआयडीसीतील ऑक्सिएअर या ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टला भेट देऊन पाहणी केली.
रांजणगाव एमआयडीसी येथील ऑक्सिजन निर्मिती प्लँटला भेट देऊन पाहणी केली.