शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

घोटावडे फाट्यावर दररोज चक्काजाम

By admin | Updated: April 29, 2017 03:50 IST

पुणे-कोलाड मार्गावरील मुळशी तालुक्यातील सर्वांत मोठा व महत्वाचा असणाऱ्या घोटावडे फाटा चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

पिरंगुट : पुणे-कोलाड मार्गावरील मुळशी तालुक्यातील सर्वांत मोठा व महत्वाचा असणाऱ्या घोटावडे फाटा चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना व ग्रामस्थांना करावा लागत आहे. मुळशी तालुक्याला लाभलेली मोठी औद्योगिक वसाहत व आयटी पार्कमुळे तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे नोकरीसाठी व उद्योगधंद्यासाठी ये-जा करण्यांचे प्रमाण वाढले आहे. पुणे, पिपरी-चिंचवड किंवा उपनगरांमधून दररोज ये-जा करीत असतात. त्यामुळे बस, कार, दुचाकी व मालवाहतूक गाड्या आणि कंटेनर या वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मुळशी तालुक्यातील पिरंगुट, उरावडे, पौड, घोटावडे, हिंजवडी, माण, घोटावडे फाटा चौकाच्या चारही बाजूला असलेल्या गावांमध्ये लहान-मोठे उद्योगधंदे व औद्योगिककरण आहे. त्यामुळे चारही बाजूने ये-जा करणारी वाहने या चौकात एकत्रित येतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. तसेच घोटावडे फाटा चौक हा मुळशी तालुक्यातील सर्वांत महत्वाचा व मोठा चौक आहे. चौकाच्या पूर्वेला पुणे, पश्चिमेला कोकण, दक्षिणेला लवासा व उत्तरेला हिंजवडी आयटी पार्क अशी महत्वाची ठिकाणे आहेत. चारही दिशेचे रस्ते चौकामध्ये जोडलेले आहेत. संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान बहुतांशी कंपन्या, शाळा व सरकारी आॅफिसेस सुटतात. त्यावेळी वाहतुकीची खूपच मोठी कोंडी होते.काही दिवसांपूर्वी या चौकामध्ये सिग्नल बसविण्यात आला. परंतु तो सिग्नल केवळ शोभेची वस्तू बनून राहिलेला आहे. कारण, या सिग्नलमुळे कोंडी सुरळीत करता येत नसल्याने वाहतूक पोलिसांकडून तो बंद ठेवण्यात येतो. महत्वाचे म्हणजे वाहतूकही विस्कळीत असते. त्यात रस्ता अरुंद पडतो. चौकामध्ये पोलिसांनी वाहनचालकांना थांबण्याचा इशारा केल्यानंतर नेमके थांबायचे कुठे, हाच मोठा प्रश्न वाहनचालकांना पडतो. कारण या ठिकाणी चौकामधील रस्त्यावर रोड लाईन नाही. सिग्नलला वाहने उभी राहिल्यानंतर पादचाऱ्यांनी रस्ता कोठून व कसा ओलांडायचा हा मोठा प्रश्न त्यांना पडतो. कारण, या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नाही. रस्ता विभाजन, रोड कटिंग लाईन नसल्याने रोडच्या एकाच बाजूला सरळ लाइनमध्ये वाहनचालक काळजीपूर्वक वाहन घेत नाही.(वार्ताहर)