शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी ६० ते ७० हजार मुलांचा वाचेल जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने न्युमोनियावर विकसित केलेल्या ‘न्युमोसिल’ या लसीचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते केले. त्यानंतर पुनावाला ...

पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने न्युमोनियावर विकसित केलेल्या ‘न्युमोसिल’ या लसीचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते केले. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत लसीबाबत माहिती दिली. यावेळी सिरमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस पुनावाला, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजीव ढेरे आणि डॉ. विस्ताप्स सेठना उपस्थित होते. ते म्हणाले, न्युमोनियामुळे लहान मुलांना सर्वाधिक धोका असतो, त्यामुळे आम्ही या मुलांचे मृत्यू रोखण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या लसीची पहिली मानवी चाचणी प्रौढ व्यक्तींमध्ये झाली. १२ ते २४ महिन्यांच्या मुलांमध्ये चाचणी झाल्यानंतर नवजात बालकांमध्ये चाचणी घेण्यात आली. भारतासह आफ्रिकन देशांमध्ये या चाचण्या झाल्या. सुमारे आठ वर्ष लसीवर संशोधन सुरू होते. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये भारतातील ७० ते ८० टक्के बालकापर्यंत ही लस पोहचलेली असेल. त्यासाठी केंद्र शासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच ही लस खासगी बाजारपेठेतही उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावी व युनिसेफशी या लसीसंदर्भात करार केला आहे.

--

लस मिळेल २२० ते २२५ रुपयांत

भारतात परदेशातून येणाऱ्या लसीच्या किंमतीपेक्षा ही लस अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारकडून अडीच ते तीन कोटी लसीची मागणी केली आहे. ही लस साधारणपणे २२० ते २२५ रुपयांत दिली जाईल. सिरमची क्षमता प्राथमिक टप्प्यात सुमारे १० कोटी लसींची आहे. गावीसह युनिसेफ व इतर देशांनाही या लसीचा पुरवठा केला जाईल.

--

असा घ्यावा लागेल डोस

लसीचे एकूण तीन डोस असतील. नवजात बालकांना पहिल्या महिन्यात पहिला डोस व त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने दुसरा डोस द्यावा लागेल. तर तिसरा डोस सहा महिन्यांच्या कालावधीने द्यावा लागेल. पुढील दोन ते तीन वर्षामध्ये मुलांची प्रतिकारशक्ती विकसित होईल. तसेच कुटूंंबियांतील इतर सदस्यांमध्येही या लसीमुळे सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. त्यामुळे या लसीचा फायदा संपुर्ण कुटूंबाला होऊ शकेल, असा दावा यावेळी केला.

--

न्युमोसिल ही लस आरएनए किंवा स्पाईक प्रोटीन स्वरूपाची नाही. यामध्ये पॉलीसॅक्राईड चा वापर अँटीजेन म्हणून आणि प्रोटीन वापर वाहक (कॅरिअर) म्हणून करण्यात आला आहे. लसीच्या विकसन प्रक्रियेला काँज्युकेशन प्रोसेस असे नाव दिले. त्यामुळे या लसीला न्युमोकोकल काँज्युकेटेड व्हॅक्सिन म्हटले जात आहे.