शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

‘एव्हरेस्टवीर’ पोलीस दाम्पत्य निलंबित

By admin | Updated: November 18, 2016 06:31 IST

‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ सर केल्याचा दावा करणाऱ्या पोलीस दाम्पत्याचा खोटेपणा उघड होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी

पुणे : ‘माऊंट एव्हरेस्ट शिखर’ सर केल्याचा दावा करणाऱ्या पोलीस दाम्पत्याचा खोटेपणा उघड होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दोघांनाही खात्यामधून निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी कायम ठेवली आहे. यापूर्वी नेपाळ सरकारने त्यांच्यावर दहा वर्षांची बंदी घातलेली आहे. पोलीस शिपाई दिनेश चंद्रकांत राठोड आणि पोलीस नाईक तारकेश्वरी चंद्रकांत भालेराव (राठोड) अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या पोलीस मुख्यालयामध्ये नेमणुकीस आहेत. दोघांचाही प्रेमविवाह झालेला असून, त्यांनी यापूर्वी आॅस्ट्रेलियामधील सर्वोच्च शिखर सर केल्याचाही दावा केला होता.या दोघांनी एव्हरेस्ट मोहिमेमध्ये भाग घेत हे शिखर सर केल्याचा दावा केला होता. दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होताच आर. एक्स. कम्युनिकेशनच्या संचालिका अंजली शरद कुलकर्णी यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन दोघांच्या मोहिमेबाबत संशय व्यक्त केला होता. फोटो बनावट असल्याचे सांगितले होते. सहायक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये दोघांनी एव्हरेस्ट शिखर सर केले नसल्याचे समोर आले.