शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही लाचखोरी जोरात, पोलीस सर्वांत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचे महासंकट येऊन १५ महिन्यांचा काळ लोटला आहे़ सर्व समाजाला या कोरोनाने वेठीस धरले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाचे महासंकट येऊन १५ महिन्यांचा काळ लोटला आहे़ सर्व समाजाला या कोरोनाने वेठीस धरले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर, आता यावर्षी पुन्हा दोन महिने लॉकडाऊनमध्ये गेले आहेत. संपूर्ण समाज भयग्रस्त असताना सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीत काही कमी झाली नाही. उलट अधिक वाढत चालल्या आहेत. उलट गेल्या दोन महिन्यांत लाचखोरीच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

२०२१ मधील पहिल्या पाच महिन्यांपैकी जवळपास दोन महिने पुणे शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रमुख व्यवहार बंद आहेत. असे असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक सापळा कारवाया झाल्या आहेत. गेल्या वर्षी २३ मेपर्यंत २० कारवाया झाल्या होत्या. गेल्या वर्षभरापासून सर्व समाज कोरोनामुळे त्रस्त आहे़ असे असतानाही सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याचे काहीही सोयरसूतक नाही. उलट कोरोनाचा गैरफायदा घेऊन ते नागरिकांना अधिक त्रास देत असल्याचे दिसून आले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. असे असतानाच पुणे शहरात गेल्या ५ महिन्यांत सर्वाधिक लाचखोरी होत असल्याचे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यातील २१ सापळा कारवायांपैकी ८ सापळा कारवाया पुणे शहरात झाल्या आहेत.

आरोग्य विभागही नाही मागे

कोरोनाकाळात बहुसंख्य डॉक्टर, परिचारिका जिवावर उदार होऊन काम करीत असताना हॉस्पिटलमधील झारीतील शुक्राचार्य मात्र लाचखोरी करण्यात दंग आहेत. कोरोनापश्चात फॉर्मच्या छपाईचे बिल काढण्यासाठी जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला २० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. जनआरोग्य योजनेनुसार मोफत उपचार असतानाही पवना हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून १० हजाराची लाच घेताना डॉक्टराला पकडण्यात आले. तसेच कामगारांची अँटिजन चाचणी केली असताना त्याचे रिपोर्ट देण्यासाठी दौंडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला लाच घेताना पकडण्यात आले आहे.

.........

पुणे जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वर्षसापळा कारवाईआरोपी

२०१८ २०० -

२०१९ १८४ २५८

२०२० १३९ १९५

२०२१ २१ ३०

(२३मेअखेर)

.....

कोरोनाकाळात सापळा कारवाई

विभागकारवाया

पोलीस६

महसूल३

आरोग्य३

महावितरण २

आरटीओ, विधी व न्याय, भूमापन, सहकारी संस्था, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेखा, पाटबंधारे (प्रत्येकी १)