शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरांतरही श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील व्यवहार ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST

तळेघर : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची ...

तळेघर : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने देवदर्शनासाठी भाविकांची संख्या कमी होवून मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट आहे. त्यामुळे येथील व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी नेहमी भाविक, पर्यटकांची गर्दी होत असते. याशिवाय भीमाशंकर अभयारण्यातील नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉईंट, भाकादेवी पाॅईंट कोंढवळ धबधबा, गोहे पाझर तलाव, डिंभे धरण, आहुपे आदि पर्यटनस्थळांवर देखील नागरिक, पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी भेट देतात. महाशिवरात्री नंतर श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकभक्त निसर्गप्रेमी व पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. विशेषत: होळी, धुळवड या सणांनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मंदिर परिसरातील बेल-फुल, माळ, रूद्राक्ष, डोलीवाले, वनस्पती औषधे, खेळणी, हॉटेल, लॉज आदी ५५० व्यवसाय येथे आपला चरितार्थ चालवितात. परंतु मागील वर्षापासून कोरोनामुळे येथील व्यवसायावर गदा आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास हॉटेल, लॉज आदी चालू करण्यास व मंदिर उघडण्यास राज्य शासनाने काही नियम व अटींसह परवानगी दिली. सर्व सुरळीत चालू असतानाच पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने भाविक, पर्यटकांची संख्या कमी होऊन येथील परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच झाली आहे.

दरवर्षी या ठिकाणी देवदर्शन व पर्यटनासाठी मुंबई, पुण्यासह इतर राज्यांतून देखील लाखो भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यातुन येथील व्यावसायिकांचे अर्थाजन चालते. परंतु सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकभक्त व पर्यटकांनी भीमाशंकरकडे पाठ फिरवल्याने याचा व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे.

--

कोट

आठ ते नऊ महिन्यांनंतर शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र राज्यांप्रमाणे पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होवू लागली आहे. दिवसभरामध्ये अवघे शंभर ते दीडशे भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे त्याचा परिणाम स्थानिक छोट्या मोठ्या व्यवसायावर झाला आहे. व्यवसायिकांना दिवसदिवस एकाही रुपयाची विक्री होत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार, अशी चिंता त्यांच्यापुढे उभी राहिली आहे.

- वेदमूर्ती मधुकरशास्त्री गवांदे,

ज्येष्ठ सहकार्यकारी विश्वस्त श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान _

--

फोटो २७ तळेघर भीमाशंकर

- श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकभक्तांविना असलेला शुकशुकाट.