शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोविड पॉझिटिव्ह मतदारांनीही मतदानाचा हक्क चुकवू नये, फक्त काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:11 IST

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडत आहे. पुरंदर प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत ...

जेजुरी: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडत आहे. पुरंदर प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत तयारी केलेली असून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची ही काळजी घेतली जात आहे. या निवडणुका कोविड महामारीच्या पार्श्व्भूमीवर होत असल्या तरीही कोविड पॉझिटिव्ह मतदारांनीही योग्य ती काळजी घेत मतदान करावे. अशा मतदारांनी शेवटच्या तासात मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांना कल्पना द्यावी. मगच मतदान करावे असे आवाहन पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी होणार्‍या निवडणुकीत ४१७ जागांसाठी ८९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने २०१ मतदान केंद्रे आणि १३०० कर्मचार्‍यांची नेमणूक केलेली आहे.पोलिस प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील परिसरात पथसंचलन करून मतदान शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच यावेळात मतदान घेतले जाणार असून सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून कर्मचारी नेमले आहेत. येणार्‍या प्रत्येक मतदाराची तपासणी व सनीटायझेशन करण्यात येणार आहे. मतदारांनी मास्क लावूनच मतदान केंद्रात प्रवेश करायचा आहे. तपासणीच्या वेळेस एखाद्या मतदाराला ताप जाणवला तर त्याला शेवटच्या तासात मतदान करावे लागणार आहे. त्याच बरोबर पॉझिटिव्ह मतदारणी ही मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांना अगोदर कल्पना द्यावी. व मतदानाचा हक्क बजवावा. कोणी ही आपला मतदानाचा हक्क डावलू नये असे आवाहणही करण्यात आले आहे.