शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही मजुराने दिले पाच जणांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आजच्या युगात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो. एवढेच काय आपले अवयवसुद्धा विकायला तयार असतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आजच्या युगात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असतो. एवढेच काय आपले अवयवसुद्धा विकायला तयार असतो. मात्र, बेल्हा येथील एका कुटुंबाने मुलाच्या मृत्यूनंतर चक्क त्याचे अवयव दान करत समाजापुढे आदर्श निर्मण केला आहे. डोळे, फुफ्फुस, हृदय, यकृत, किडनी गरजूंना दान करत या कुटुंबाने चार जणांना जीवदान देत अवयव दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.

संतोष धोंडिभाऊ बांगर (वय ४३) असे या दानशूर मजुराचे नाव आहे. बेल्हा (ता. जुन्नर) येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे संतोष हा मजूर म्हणून काम करत होता. काम करत असतांना एका लाकडी परातीच्या फळीवरुन त्याचा पाय घसरला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्ग्णालयात दाखल केले. परंतु दोनच दिवसात उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे छत्र हरवले.

संतोषला वडील नाहीत वृद्ध आई,पत्नी व एक ७ व्या इयत्तेत शिकत असलेला मुलगा आहे. फक्त ११ गुंठेच जमिन. त्यात एक लहान भाऊ सगळ काही मजुरीवरच चालायच. त्यात कमावता गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला अशाही परिस्थितीत स्वतःचे डोंगराएवढे दुःख बाजुला त्यांनी ठेवले. अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र या अशिक्षित मजुराच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढं यावं असं आवाहन जानकू डावखर,बबन औटी, विकास बढे यांनी केलं आहे.

चौकट

संतोषच्या दशक्रिया विधीच्या वेळी ब्राम्हण, नाभिक समाज, प्रवचनकार, स्पिकरव्यवस्था या सर्वांनी निशुल्क सेवा देऊन स्वतः रोख मदतही दिली. मजुरांना काम करताना सुरक्षितता वाटेल तसेच मजुरांचा सामुहिक विमा परंतु या सर्व गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुटूंबातील एकमेव कमावता आधार गेल्यानंतर कुटूंब उघड्यावर पडते. दोन ते चार दिवस इतर लोक चुकचुकतात नंतर मात्र त्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होते किंवा समाज विसरुन जातो.यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी मजुरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मत माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांनी व्यक्त केले.