शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनानंतरही १००४ जोडप्यांचा नांदण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम ...

पुणे : लॉकडाऊन काळात पगारात झालेली कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेले नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम, घरात काम करण्यावरून सातत्याने होणारे शीतयुद्ध, एकमेकांचा अहंकार, मित्र-मैत्रिणींना चॅटिंग करण्यावरून संशयाचे वातावरण आदी कारणांमुळे वर्षभरात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेतले आहेत, तर त्यातील ८१ जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा नांदायला गेली आहेत.

लॉकडाऊन खरंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची निवांत संधी होती. मात्र, या संधीचे सोने करण्याऐवजी अनेक जोडप्यांमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आणि त्याची परिणिती घटस्फोटांमध्ये झाली. याविषयी विवाह समुपदेशक लीना कुलकर्णी सांगतात, केवळ लॉकडाऊनमध्येच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्येच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्ती’केंद्रित समाजरचनेकडे चाललो आहोत. मी, माझी प्रगती झाली पाहिजे. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. यातच माणसाला स्वीकरण्याची आणि सहन करण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. शेअरिंग देखील कमी झालंय. सुना किंवा तरुण मंडळी जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. तेव्हा घरातील ज्येष्ठांनी स्वत:चं एक विश्व तयार केलेले असते. पण जेव्हा २४ तास एकमेकांबरोबर राहायची वेळ येते. तेव्हा त्यातील बारीक धागेदोरे समजून घेण्याची आणि सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याचे पाहायला मिळते. आपण जेव्हा ‘स्पेस’ असे म्हणतो, तेव्हा त्याची व्याख्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली असते. ज्या वेळी जोडपी अपरिहार्यतेने एकत्र आली, त्या वेळी ती एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरकाव करायला लागली. त्यांचे एक रूटीन डिस्टर्ब झाले. अवकाशाचा संकोच व्हायला लागला. विशेष म्हणजे, लॉकडाऊनकाळात एकमेकांचे विवाहबाह्य संबंध खुले झाले. माझ्याकडे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात लग्न झालेल्या तीन केसेस आल्या. लग्नानंतर लगेचच त्यांना टाळेबंदीचा सामना करावा लागला. तिन्हीही तरुणी करिअरिस्ट होत्या. त्या काळात त्यांना घरच्या कामाची सवय नसल्याचे कुटुंबाला कळून चुकले. तरुणींमध्ये ऐकण्याची वृत्ती राहिलेली नाही. काही तरुणींना समुपदेशनातून हे पटते.

------

काय व्हायला हवंय...

* एकमेकांशी पारदर्शी संवाद हवा.

* एकमेकांना निरपेक्षपणे स्वीकारण्याची वृत्ती हवी.

* एकमेकांवर विश्वास हवा.

* एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं.

---

टाळेबंदीच्या काळात अनेक लोकांच्या विशेषत: आयटीमधील तरुण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या. पगारकपात झाली. त्यामुळे प्रापंचिक आणि पैशावरून वाद सुरू झाले. घरात काम कुणी करायचे? यावरून एकमेकांचा अहंकार आडवा यायला लागला. छोटी भांडणे देखील विकोपाला गेली. मुलीच्या कुटुंबाचा देखील नको तेवढा हस्तक्षेप वाढला. या कारणांमुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अडीच वर्षांत परस्परसंमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल आहेत. त्यातील १ हजार ९१२ घटस्फोटांचे दावे पस्स्परसंमतीने निकाली काढले आहेत. दाव्यांच्या आकडेवारीनुसार घटस्फोटाचे दररोज ५ दावे दाखल होत आहेत. घटस्फोटाचे दावे दाखल झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांमध्ये जोडप्यातील वाद मिटवून त्यांचा संसार पूर्ववत करण्यास यश मिळाले आहे.

- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

---

आज जोडप्यांची जुळवून घेण्याची लवचिकता कमी झाली आहे. तरुण पिढीला जुळवणी आणि तडजोड यातला फरक समजून सांगितला पाहिजे. तसं झालं नाही तर त्यातून विवाह विच्छेद हा अटळ आहे. संसाराचा रथ हा दोन चाकांवर चालतो. तो एकत्रितपणे चालण्यासाठी ‘मी’पणाचा प्रवास ‘आम्ही’पर्यंत नेण्याची गरज आहे.

- लीना कुलकर्णी, विवाह समुपदेशक