शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी करूनही दारूचे गुत्ते सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 04:11 IST

खेड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये गावठी दारूगुत्त्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येत आहे.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये गावठी दारूगुत्त्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. मात्र त्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला सपशेल अपयश येत आहे. व्यावसायिकांनी अडचणींच्या ठिकाणी गावठी दारूचे गुत्ते उभारले आहेत. या गुत्त्यांमधून छुप्या मार्गाने दिवस-रात्र गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. बहुतांशी ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनसुद्धा हे गुत्ते बंद होत नसल्याची सत्यस्थिती आहे. त्यामुळे खाकीची ताकद अशा व्यावसायिकांसमोर कमी पडते की काय? असा संतापजन्य प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वडगावच्या स्मशानभूमी परिसरातील दक्षिणवाहिनी भीमा-भामा नदीच्या पात्रात कोयाळी हद्दीत राजरोसपणे दारूगुत्ते सुरूआहेत. आठ-दहा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन येथील दारूगुत्ता उद्ध्वस्त केला होता. मात्र संबंधित व्यावसायिकांनी तो दोन दिवसांनी पुन्हा सुरूकेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. शेलपिंपळगाव-दावडी रस्त्यावर विद्युत कक्षाशेजारील परिसरात गावठी दारू गुत्त्यामधून राजरोसपणे दारूची विक्री केली जात आहे. बहुळ गावाच्या हद्दीत एक-दोन ठिकाणी दारूगुत्ते असून, मोहितेवाडी परिसरात चिंचोशी रस्त्यालगत दारूचा गुत्ता असून तिथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत आहे. अनेक दिवसांपासून भीमा-भामा नदीच्या पात्रात दारू व्यावसायिकांनी विनापरवाना गावठी दारू तयार करण्याचे गुत्ते थाटले आहेत. वडगाव-घेनंद गावात महिलादिनी रणरागिणींनी एकत्र येऊन दारूबंदीचा ठराव मंजूर केला होता. मात्र शेजारील गावाच्या हद्दीत अज्ञातस्थळी लपून-छपून चालणाऱ्या या दारूगुत्त्यांमुळे या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे. नदीच्या पात्रात उत्खनन करून दारू बनविण्यासाठी चूल आणि लागणाऱ्या इतर सोयींची पूर्तता व्यावसायिकांनी केली असून, याच ठिकाणी हा व्यवसाय केला जातो. हे गुत्ते पोलिसांनी तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.