शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
3
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
4
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
5
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
6
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
7
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
8
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
9
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
10
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
11
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
12
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
13
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
14
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
15
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
16
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
17
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
18
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
19
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
20
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण

शालेय दक्षता समित्यांची होणार स्थापना

By admin | Updated: August 7, 2015 00:28 IST

शाळांमधील मुला - मुलींचे शाळेच्या वेळेत केले जाणारे लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विशाखा समितीच्या धर्तीवर शाळांमध्ये लैंगिक तक्रार

पुणे : शाळांमधील मुला - मुलींचे शाळेच्या वेळेत केले जाणारे लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विशाखा समितीच्या धर्तीवर शाळांमध्ये लैंगिक तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, या समित्यांची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनास अखेर जाग आली असून, पुढील महिनाभरात सर्व शाळांमध्ये अशा समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी गुरुवारी मुख्यसभेत दिली. महापालिकेकडून या समित्या स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. याची दखल घेऊन मुख्यसभेत या समित्या स्थापन करण्याची मागणी सर्वपक्षीय महिला नगरसेविकांंनी केली. तसेच हा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्याने ‘लोकमत’वर कौतुकाचा वर्षाव केला.मुख्यसभा सुरू होताच, भाजपाच्या नगरसेविका मनीषा घाटे यांनी ‘लोकमत’मधील वृत्ताचा हवाला देत शालेय शिक्षण समित्या नसल्याने पालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने मुलींना लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारींचा पाढाच वाचला. तसेच महर्षीनगर येथील शाळेमध्ये ८ मुलींसोबत शिक्षण मंडळाने नेमलेल्या एका संस्थेच्या शिक्षकाने केलेल्या अश्लील कृत्याचा दाखला दिला. अशा अनेक घटना घडत असताना, या समित्या स्थापन करण्याकडे दुर्लक्ष करीत महापालिका प्रशासन असे गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालत असून, या समित्या तत्काळ स्थापन कराव्यात, अशी मागणी घाटे यांनी केली. तर शाळांमध्ये अशा घटना दिवसेंदिवस वाढत असताना, शिक्षण मंडळाने समित्या का स्थापन केल्या नाहीत, याचा खुलासा करण्याची मागणी नगरसेविका वर्षा तापकीर यांनी केली. या घटनांमुळे मुली शाळेत जाण्यास घाबरत असल्याचेही तापकीर यांनी सांगितले. शाळांमध्ये अशा घटना घडताना दक्षता समित्यांची आवश्यकता आहे. या घटनांमुळे विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराची बदनामी होत असून, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केली. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना वाढत असून, त्याबाबत दुर्लक्ष करत असलेल्या अधिकाऱ्यांना घरी पाठविण्याची मागणी नगरसेविका पुष्पा कनोजिया, नंदा लोणकर, अस्मिता शिंदे यांनी केली.