शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विशाखा समिती तातडीने स्थापन करा

By admin | Updated: March 31, 2015 05:25 IST

कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये,

पुणे : कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये, संस्थांना बंधनकारक आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही समिती स्थापन झालेली नाही त्यांनी १० एप्रिलपर्यंत समिती स्थापन करण्याचे आदेश महिला व बाल विकास आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी सोमवारी दिले. तसेच स्थापन झालेल्या समितींच्या कामकाजाचा अहवाल देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत. ‘लोकमत’ने विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे विशाखा समितीबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये शहरातील तब्बल ८६ टक्के महिलांना ‘विशाखा’बाबत माहितीच नसल्याचे समोर आले. याबाबतचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. आजही बहुतेक कार्यालयांमध्ये समितीच स्थापन करण्यात आलेली नाही तर काही समित्या केवळ कागदोपत्रीच आहेत. त्याची तातडीने दखल घेऊन महिला व बाल विकास आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वेक्षणातून विशाखाबाबत असलेली उदासीनता समोर आली. सर्व संंबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी विशाखा समितीबाबत आढावा घेण्याचे आदेश दिले.