शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथांमध्ये दडले जीवनाचे सार

By admin | Updated: February 6, 2015 00:30 IST

ग्रंथांमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. त्याचा प्रसार करीत ज्ञानाचे दान केल्यास मानवता धर्म अधिक समृद्ध होईल आणि विश्वात शांतता प्रस्थापित होईल’’,

पुणे : ‘‘ग्रंथांमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. त्याचा प्रसार करीत ज्ञानाचे दान केल्यास मानवता धर्म अधिक समृद्ध होईल आणि विश्वात शांतता प्रस्थापित होईल’’, असे प्रतिपादन माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एमआयटी संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण, बायबल, तुकारामगाथा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या ग्रंथांचा या तुलेमध्ये समावेश होता. तुला केलेले ग्रंथ एमआयटी समूहातील सर्व संस्थांच्या प्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुखांना देण्यात आले. या प्रसंगी ऊर्मिला कराड, पंडित वसंतराव गाडगीळ, उषा कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, काशीराम कराड, प्रभू घुले, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटीचे कुलसचिव एस.व्ही. कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड, प्रा. राहुल कराड उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुढील पिढीने ज्ञानदान सुरू ठेवावे४वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची झालेली ग्रंथतुला ही त्यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याची पूजा आहे. या ग्रंथतुलेतील ग्रंथ ज्ञानदीप आहेत. त्यामुळे या ग्रंथांचे सर्वांनी वाचन करून त्यातला मथितार्थ समजून घ्यायला हवा. एमआयटीतील पुढील पिढीने कराड यांचा वारसा पुढे नेत ज्ञानदानाचे कार्य नियमितपणे चालू ठेवावे. अध्यात्माचा अर्थ समजला४प्रा. कराड म्हणाले, ‘‘वडिल भगिनी प्रयागअक्कांनी मला जगण्याची प्रेरणा दिली. अध्यात्माचा खरा अर्थ समजून सांगितला. दुसऱ्यासाठी कायम झीजत राहाण्याची शिकवण मोठ्या भावाने दिली. ४महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, डॉ. सुरेश घैसास, डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे उपाध्यक्ष राहुल कराड, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.समाजासाठी झिजणे आनंददायी ४धार्मिक वृत्तीचा आणि अंधश्रद्धा जोपासणारा देश अशी भारताची प्रतिमा पाश्चिमात्य देशांनी केल्याची खंत माझ्या मनात आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा संगम करण्याचा माझा प्रयत्न आहे. एका जागी बसून गंजण्यापेक्षा समाजासाठी कार्य करीत झिजणे अधिक आनंददायी आहे. त्यामुळे भविष्यातही मी जिद्दीने काम करीत राहणार आहे, अशी कृतज्ञापूर्वक भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केली.४एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळींतर्फे कराड यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.