शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

काळाच्या ओघात ‘वाघबारस’ उरला केवळ नैवेद्यापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:17 IST

वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.

नीलेश काण्णव,  भीमाशंकरवाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे. पण, काळाच्या ओघात वाघबारस ही प्रथा नेवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे. सध्या वाघबारसच्या दिवशी जुने -जाणते ग्रामस्थ वाघदेवाच्या मंदिरात खिरीचा नैवेद्य दाखवतात. रानात जनावरे चरत असताना हिंस्त्र श्वापदांपासून आपल्या गाईगुरांचे संरक्षण व्हावे, यासाठी वाघोबाच्या मंदिरात पौष महिन्याच्या शुद्ध आणि वद्य १२ या दिवशी ‘वाघबारस’ म्हणून साजरी केली जाते. या वर्षी आज (दि. २१) वाघबारस आहे. आदिवासी भागात अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरे आहेत. आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे, तर पिंपरगणे गावाजवळ वाघोबाची मंदिरे आहेत. कोकणातही वाघोबाची मंदिरे आहेत. पण वाघबारस साजरी करण्याची प्रथा आता लोप पावत चालली आहे. वाघ संपले, भीती राहिली नाही. भीती गेल्यामुळे वाघबारसही आदिवासी विसरू लागले. आदिवासींनी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत. या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात. पूर्वी बहुसंख्य आदिवासी कुटुंबात पन्नासपेक्षा जास्त पाळीव जनावरे असत. त्यांच्या निगराणीसाठी गुराखी असत. नवीन कपडे परिधान करून गुराखी आनंदोत्सव साजरा करत. आता जनावरे फार कमी झाली. या निमित्ताने होणारे पारंपरिक कार्यक्रम मात्र विस्मरणात गेले आहेत. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणत. या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले, मुली एकत्र येत. गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडला जाई. खिरीचा नैवेद्य ठेवून सगळे प्रसाद खात असत. रात्री आठनंतर येथे कोणीही थांबत नसे. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाई. सगळे लोक तेथे जमत. गुराखी मुले वाघ, अस्वल, कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळत. उरलेली खीर खेळासाठी वापरली जाई. एखाद्याला वाघ बनवले जाई. या वाघाला पळायला लावून त्याच्या पाठीवर गरम खीर टाकली जाई. ‘आमच्या शिवेत येशील का’असे विचारले जाई. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’म्हणत असे. असे खेळ होत होते. (वार्ताहर)