शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

समतेची विचारधारा रुजवा

By admin | Updated: February 16, 2017 03:18 IST

आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. परंतु, विकृत विचारांच्या विरोधात संघर्ष करताना विचारांनीच विचारांची लढाई लढण्याची

पुणे : आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. परंतु, विकृत विचारांच्या विरोधात संघर्ष करताना विचारांनीच विचारांची लढाई लढण्याची खबरदारी घेण्याची गरज असून, समतेवर आधारित विचारधारा रुजविण्याचा निर्धार करा,’ असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला दिला. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवसन्मान गौरव सोहळा आणि विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘पद्मविभूषण’ जाहीर झाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते शरद पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे पी. ए. इनामदार, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रमोद मांडे, रमेश राक्षे, विठ्ठल गायकवाड, अ‍ॅड. मिलिंद पवार आणि वृषाली रणधीर यांना ‘शिवसन्मान’ गौरवाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण आणि शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित होते. इतिहासासंबंधीचे विश्लेषण करताना विकृत स्वरूपाचा इतिहास पोहोचविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शब्दांचा उल्लेख असा काही केला जातो, की त्या शब्दांच्या माध्यमातून विकृत विचारांची बीजे पेरली जात आहेत. गांधीवध झाला असे म्हटले जाते; मात्र वध दैत्यांचा आणि वाईट प्रवृत्तींचा केला जातो. हत्येसंदर्भात वध हा शब्द वापरला जातो, त्यामागे गांधीजींविषयी असलेला आकस आणि द्वेषाची भावना प्रतित होते, अशा शब्दांत महात्मा गांधी यांच्याविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या वृत्तीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला तसेच छत्रपती शिवाजीमहाराज हे धर्माच्या विरुद्ध नव्हते, त्यांच्यात धार्मिक विद्वेषाची भावना नव्हती. तरीही ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्याचे सांगून विद्वेषाची भावना समाजात पसरविली जात असल्याचे सांगत पवार यांनी इतिहासाच्या विकृतीकरणावर टीकास्त्र सोडले. खेडेकर यांनी महाराष्ट्र आणि बाहेरील भागात सामाजिक चळवळीच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, अशी स्तुतिसुमनेही त्यांनी खेडेकर यांच्यावर उधळली. वाचनसंस्कृती पोहोचविण्याची खबरदारी तर घेतलीच पाहिजे; पण आपण काय वाचायला देतो याचे तारतम्य बाळगा, असेही ते म्हणाले.