शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश

By admin | Updated: April 25, 2017 04:10 IST

निगडी प्राधिकरणातील रहिवाशी आणि चिंचवड एमआयडीसीमधील सहायक अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रकाश शेडबाळे

निगडी : निगडी प्राधिकरणातील रहिवाशी आणि चिंचवड एमआयडीसीमधील सहायक अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रकाश शेडबाळे यांनी कडाक्याच्या उन्हात निगडी ते शिर्डी असा सायकलवरून प्रवास करून पर्यावरण बचावाचा संदेश दिला आहे. सायकल वापरण्याने पर्यावरण तसेच आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी नुकताच निगडी ते शिर्डी २२१ किमीचा असा सायकल प्रवास केला. ४५ वर्षीय शेडबाळे यांनी सलग १९ तास सायकल प्रवास करून शिर्डीचे दर्शन घेतले. त्यांनी केलेल्या या प्रयत्नाचे शिर्डी देवस्थानानेही भरभरून कौतुक केले. व देवस्थानच्या पुजारी वाळुंजकर यांनी त्यांचा सत्कार केला. सायकल चालविण्याने आरोग्याला होणारे फायदेही त्यांनी अनुभवले होते. विशेषत: वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकल हे चांगले माध्यम आहे, असे त्यांचे मत आहे. त्यातूनच त्यांना शिर्डीपर्यंतचा प्रवास सायकलने करण्याची कल्पना सूचली. समाजाला चांगला संदेश देता येईल, या भावनेने त्यांनी निर्णय पक्का केला. त्यासाठी दोन- तीन महिने सलग सायकल चालविण्याचा सराव केला. त्यातून जिद्द अधिकच वाढली. दोन एप्रिलला पहाटे तीन वाजता निगडी येथील राहत्या घरापासून शिर्डीकडे कूच केली. उन्हाचा पारा चढल्यानंतर सायकलप्रवास करणे बरेच जड गेले. त्रास जाणवत असल्याने त्यांनी नगरच्या अगोदर असलेल्या चास गावात दोन तास विश्रांती घेतली.निगडी-शिक्रापूर- रांजणगाव- नगर राहुरीमार्गे ते रात्री दहा वाजता शिर्डीला पोचले. या मोहिमेसाठी त्यांना ‘इंडो सायकल क्लब’चे धनंजय शेडबाळे, अजित पाटील, सुनील पाटील, डॉविकास पाटील, चंद्रकांत शिंदे, संजय पाटील, कोमल पाटील यांचे सहकार्य मिळाले. (वार्ताहर)