शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाची काळजी मिटणार

By admin | Updated: July 23, 2015 04:32 IST

विविध कारणांमुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेले, चारही प्रवेश फेऱ्यांत कुठेही प्रवेश न मिळालेले, यादीत नाव येवूनही प्रवेश न घेतलेल्या

पुणे : विविध कारणांमुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेले, चारही प्रवेश फेऱ्यांत कुठेही प्रवेश न मिळालेले, यादीत नाव येवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संंधी मिळणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने चौथ्या फेरीअखेर रिक्त राहणाऱ्या जागांवर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पाचवी विशेष आॅनलाईन फेरी घेतली जाणार आहे. शाखा बदल, माध्यम बदल, राज्य शिक्षण मंडळाकडून पुनर्तपासणीत गुणांमध्ये वाढ झालेले तसेच लांबचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत अर्ज करता येणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून बुधवारी चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील विद्यार्थ्यांना दि.२३ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. तिसऱ्या फेरी अखेरपर्यंत एकूण ४८ हजार ४४७ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश झाले आहेत. तर चौथ्या फेरीत १ हजार ३८२ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर रिक्त जागांचा जागांचा प्रत्यक्ष आकडा समोर येईल. सध्या एकूण १५ हजार ७७२ जागा रिक्त आहेत. या जागांवर प्रवेशासाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी तसेच मार्चच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.अकरावीत प्रवेशासाठी पाचवी विशेष फेरी अखेरची असणार आहे. त्यामुळे या फेरीमध्ये उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष फेरीमध्ये बेटरमेंटची संधी देण्यात येणार नाही. तसेच कोणतीही प्रवेश फेरी असणार नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी रिक्त जागा व कट आॅफ पाहूनच विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरावेत, असे जाधव यांनी सांगितले.