शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशोत्सवाने विद्यार्थी भारावले

By admin | Updated: June 15, 2015 23:59 IST

महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले.

पिंपरी : महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळाली. गेले दीड महिना सुटीमुळे आळसावलेली मुले आज शाळेत येताना मोठ्या उत्साहात दिसत होती. अनेक दिवस मित्रांपासून दूर असल्यामुळे त्यांना भेटण्याची हुरहुर विद्यार्थ्यांना लागली होती. शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना वेळेत शाळेत सोडविण्यासाठी पालकांचीही तारांबळ उडाली होती. सर्वच शाळांसमोर पालकांची गर्दी पाहायला मिळाली. सुटीत कुठे गेला होता, काय-काय मजा केली, असे उत्सुकतेपोटी मुले एकमेकांना विचारत होती. शाळा आवारात वेळेआधीच गर्दी झाली होती. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. महापालिकेच्या तळवडे, संत तुकारामनगर, पुनावळे, पिंपळे गुरव येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन महापौर शकुंतला धराडे यांनी स्वागत केले. या वेळी महापालिका आयुक्त राजीव जाधव, शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, प्रशासन अधिकारी आशा उबाळे, शिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या इतर शाळांमध्ये स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थांची मेजवाणी मिळाली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच कार्यक्रमांची विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षक वर्गालाही उत्सुकता होती. त्यामुळे शाळेचा परिसर मुलांनी फुलून गेला होता. पालिकेच्या शाळांसह खासगी शाळांमध्येही स्वच्छता ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश देण्याचे नियोजन आधीच पूर्ण झाल्यामुळे गोंधळ उडाला नाही. शिशुवर्गामध्ये दाखल होणारी मुले पालकांनी बिलगुनच राहत होती. पालक सोडून जाताना रडून गोंधळ करीत होते. शिक्षक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही ते ऐकण्यास तयार नसल्याने परिसरात किलकिलाट सुरू होता.