शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’विषयी वेल्ह्यात प्रबोधन

By admin | Updated: December 1, 2014 03:46 IST

स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा,

मार्गासनी : स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा, असे आवाहन स्विस ट्रॉपिकल अ‍ॅन्ड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट स्वित्झर्लंडचे प्राध्यापक डॉ. मिचेल वीस यांनी वेल्हे येथील स्वाइन फ्लूविषयी एकदिवसीय कार्यशाळेत केले.स्विस ट्रॉपिकल अ‍ॅन्ड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट स्वित्झर्लंड व महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद आणि पंचायत समिती वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. वीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, की ग्रामीण भागात स्वाईन फ्लूविषयी अज्ञान आहे. साधा ताप आला, तरी त्याचा वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपणास स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूला असलेला परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्र मानव विज्ञान परिषदेच्या संचालिका विदुला पुरोहित यांनी स्वाईन फ्लूबद्दलची लक्षणे, प्रतिबंधक उपाय सविस्तरपणे मांडले. पुणे जिल्ह्यातील मावळ व वेल्हा तालुक्यात स्वाईन फ्लूविषयी संशोधन करण्यात आले. वेल्ह्यातील वांगणीवाडी, सोंडे कार्ला, गुंजावणे, मेटपिलावरे, खोपडेवाडी, माझगाव, आंबेड, कोंडगाव, घिसर, कानंद, कोदापूर या गावात स्वाईन फ्लूविषयी लोकामध्ये गटचर्चा करून, तर काही लोकांच्या मुलाखती घेऊन संशोधन करण्यात आले, अशी माहिती पंचायत समितीचे माजी सभापती गणपत पंडित यांनी दिली.या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद देशमाने, माजी सभापती निर्मला जागडे, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, डॉ. ख्रिश्चन स्वॅट्टी, निशा सुंदरम, महाराष्ट्र विज्ञान परिषदचे सचिव गणपत पंडित, मुख्य संशोधक डॉ. अभय कुदळे, संशोधक विदुला पुरोहित, बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता जाधवर, पर्यवेक्षिका मीना वायाळ, प्रतिभा बरबरे, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच सुनील भुरुक आदींसह अंगणवाडीताई, ग्रामसेवक, सरपंच, ी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती गणपत पंडित यांनी केले. निर्मला जागडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)