शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बालचमूंनी लुटला जादूचा आनंद

By admin | Updated: May 10, 2017 04:16 IST

जादू हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा व कुतूहलाचा विषय असतो. जादूचे प्रयोग पाहताना सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जादू हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा व कुतूहलाचा विषय असतो. जादूचे प्रयोग पाहताना सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.लहान मुलांच्या मनातील जादूबद्दलची उत्सुकता ओळखून लोकमत बालविकास मंच व संजय घोडावत ग्रुप यांच्यातर्फे जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या प्रयोगाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सहप्रायोजक रोझरी स्कूल अँड कॉलेज हे होते. लहान मुले व पालक यांनी मोठ्या प्रमाणावर जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी फ्लाइंग बॉक्स-कीप बॉक्स, मास्टर्स आॅफ प्रेडिक्शन, पॉवर आॅफ आय, गिलोटीन, गंगेची प्राप्ती, हुदनी बॉक्स यासारखे जादूचे प्रयोग प्रेक्षकांसमोर सादर केले. प्रेक्षकांनीदेखील त्यांना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद दिला. त्यातील काही आवडीच्या प्रयोगांना प्रेक्षकांनी, वन्स मोअरची दादही दिली. संमोहन विद्येचा वापर करून जादूगार प्रेक्षकांना कितीही वेळ खिळवून ठेवू शकतो, याचा प्रत्यय जादूचे प्रयोग पाहताना सर्वच प्रेक्षकांना येत होता. जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी मिस्टरीज बॉक्स आॅफ फिजी आणि कटिंग मॅन टू हाफ या परदेशातील जादूच्या प्रयोगांसोबतच अरेबिक जादूचे नमुनेही प्रेक्षकांना दाखविले. जादूच्या या प्रयोगांचा लहानग्यांबरोबरच पालकांनीही मनमुराद आनंद लुटला.