शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगा

By admin | Updated: November 14, 2014 23:42 IST

व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र 108 मुनीश्री प्रतीकसागर महाराज यांनी सर्वधर्मीय सत्संग सोहळ्यात भाविकांना दिला.

दौंड : व्यसन हे मनुष्य आणि समाजाच्या दृष्टीने घातक आहे. तेव्हा व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र 108 मुनीश्री प्रतीकसागर महाराज यांनी सर्वधर्मीय सत्संग सोहळ्यात भाविकांना दिला. 
व्यसनामुळे मानवाची, कुटुंबाची आणि समाजाची हानी होत असते. तेव्हा व्यसनेही काही माणसं स्वत:हून लावून घेतात. तर काही मित्रंच्या सहवासात राहून व्यसनी होतात. त्यानुसार जीवनात सर्वात मोठे विष म्हणजे विविध प्रकारची व्यसने होय. तेव्हा माणसांनी व्यसने सोडून धार्मिक आणि सामाजिक सत्संग सोहळ्य़ात हजेरी लावून तेथील चांगले गुण अंगीकारले पाहिजे, की जेणोकरुन जीवन स्वर्ग बनेल. वाईट गोष्टी समाजातून नष्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी वाईट लोकांवर सामाजिक बहिष्कार घातला, तर ख:या अर्थाने एक आदर्श समाज प्रणाली निर्माण होणार आहे. तेव्हा मानवाने व्यसने करु नयेत, असे प्रतीक सागरजी महाराज म्हणाले. सुशील शहा यांनी प्रास्ताविक, तर तुषार दोशी यांनी सूत्रसंचालन केले. शंकुतला गोलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. दिवाकर लुंड, प्रताप लुंड, वैभव टाटिया, अरविंद गोलांडे, मनिष कांबळे यांनी दीपप्रज्वलन केले, तर महाराजांना वसंत सैजवाल यांनी शास्त्रभेट दिली. सायंकाळच्या दुस:या सत्रत मार्गदर्शन करताना प्रतीकसागरजी महाराज म्हणाले, की वाईट कामांचा सामना करा, पाप केले असेल, तर त्याचे प्रायचित्त करा. कारण त्यातूनच चांगला मार्ग मिळणार आहे. स्त्री ही स्त्रीची वैरी असते. ब:याचदा मुलगी होणार म्हणून गर्भपात केले जातात. याच्याशिवाय जगात दुसरे कुठलेही पाप नाही. तेव्हा स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे पाप करु नका, असे प्रतीकसागर महाराज म्हणाले.  शेवटी एक हजार आठ दीपोत्सवाने महाराजांची महाआरती करण्यात आली. दरम्यान शनिवार (दि.15) रोजी सर्वधर्मीय सत्संग महोत्सवाची सांगता होत आहे.  (वार्ताहर)
 
हीच खरी गुरुदक्षिणा
4भाविकांना मार्गदर्शन करताना प्रतीकसागरजी महाराज म्हणाले, की गुरूला प्रत्येक शिष्याने गुरुदक्षिणा देणो बंधनकारक आहे. त्यानुसार मलाही गुरुदक्षिणा मिळाली पाहिजे. ती म्हणजे सर्वानी निव्र्यसनी झाले पाहिजे. सभामंडपातून बाहेर जाताना व्यसने सोडून जा, हीच माझी मोठी गुरुदक्षिणा आहे, असे सांगून त्यांनी उपस्थित पुरुषांना व्यसन न करण्याची शपथ दिली.