शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

पिंपरी महापालिकेने उघडल्या इंग्रजी शाळा

By admin | Updated: May 11, 2015 06:43 IST

महापालिकेच्या शाळांतील मुलांची संख्या कमी होऊन त्या बंद पडत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका मात्र यास अपवाद ठरली आहे.

अमोल जायभाये, पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या शाळांतील मुलांची संख्या कमी होऊन त्या बंद पडत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका मात्र यास अपवाद ठरली आहे. या पालिकेने मुलांसाठी मोफत इंग्रजी शिक्षणाची सोय करून खासगी शाळांवर तोडगा काढला आहे. येथील पालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागत आहेत.महापालिकेच्या वतीने चिंचवड आणि भोसरी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा चालवल्या जातात. इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांना हजारो रुपयांचे शुल्क मोजावे लागते. शिवाय या शाळा मर्जीप्रमाणे नियम लादतात. या पालिकेने मात्र इंग्रजी शिक्षणही निशुल्क सुरू केल्याने सर्वसामान्य पालकांना पर्याय मिळाला आहे. कोणतेही शुल्क न देता येथे आतापर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. शहरामध्ये या दोनच शाळा असल्यामुळे त्या आता अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आणखी चार शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील एक शाळा बोपखेल येथे सुरू होणार आहे. शिक्षणाच्या खासगीकरणाला पर्याय देत स्वत:हून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे. इतर महापालिका व जिल्हा परिषदांनी हा आदर्श घेतल्यास खासगी शाळांना मोठा पर्याय उभा राहू शकतो.आधी येईल त्याला प्रवेश मिळणार४महापालिकेची पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सन २००३ मध्ये इंग्लिश मीडियम पिंपरी स्कूल या नावाने सुरू झाली. त्यानंतर २००५ मध्ये महात्मा फुले यांच्या नावाने चिंचवडमध्ये शाळा सुरू झाली. या शाळांत पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. ४सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. मात्र, आता या शाळांना मोठा प्रतिसाद आहे. जो अगोदर येईल त्याला प्रवेश हे येथील सूत्र आहे. शाळांत सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर १४ शिक्षक ४इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी महापालिकेने १४ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. ४गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांना वेळोवेळी अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते. २००४ मध्ये या शाळांत ६४ पट होता. तो गतवर्षी बाराशेवर गेला. ंखासगी इंग्रजी शाळांसाठी पालकांना मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते. सर्वच पालक हे शुल्क भरू शकत नाहीत. त्यासाठी महापालिकेने मोफत इंग्रजी शाळा सुरू केल्या. या शाळा वाढवत नेण्याचा महापालिकेचा विचार आहे.- आशा उबाळे, प्रशासन अधिकारी,शिक्षण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका.