शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता तरुणी खूनप्रकरणी आरोपीस अटक

By admin | Updated: December 30, 2016 05:05 IST

एकतर्फी प्रेमप्रकरणातून सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हिच्या खुनातील संशयित तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक करून वडगाव (मावळ) न्यायालयात गुरुवारी हजर केले.

पिंपरी : एकतर्फी प्रेमप्रकरणातून सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हिच्या खुनातील संशयित तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक करून वडगाव (मावळ) न्यायालयात गुरुवारी हजर केले. या वेळी न्यायालयाने आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अन्य तीन आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथक बंगळुरूला पाठविण्यात आले आहे. देहूरोड पोलिसांनी संतोष कुमार (वय २४, रा. बिहार) या तरुणाला अंतराच्या खूनप्रकरणात संशयित आरोपी म्हणून बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला दुपारी वडगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी हा मूळचा बिहारचा असून, तो बंगळुरूमध्ये आयटी कंपनीत नोकरी करतो. बंगळुरू येथे अंतरा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये संगणकाचे शिक्षण घेत होती त्याच इन्स्टिट्यूटमध्ये आरोपी संतोषसुद्धा शिक्षण घेत होता. त्या वेळी त्यांची ओळख झाली होती. अंतराने नोकरीसाठी पुण्यातील कंपनीत प्रयत्न सुरू केले. तिला तळवडेतील कॅपजेमिनी कंपनीत नोकरीसुद्धा मिळाली. ज्या वेळी ती पुण्यातील कंपनीत मुलाखतीसाठी आली होती, त्या वेळी आरोपी संतोषसुद्धा पुण्यात येऊन गेला होता.एक वर्षापासून आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिच्याकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. अंतरा त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. संतोष मात्र तिला वारंवार मोबाईलवर संदेश पाठवून आपल्या भावना व्यक्त करत होता. अंतराने मात्र याबाबत त्याला प्रतिसाद दिला नव्हता. पुण्यात अंतरा कोणाच्या संपर्कात आहे, तिचा दैनंदिन नित्यक्रम कसा आहे, ती कोणाला भेटते, कोणाबरोबर फिरते, या तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास त्याने पुण्यातील मित्रांना सांगितले होते. अंतरा तळवडे येथील कॅपजेमिनी कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. शुक्रवारी तिला कंपनीतून घरी घेऊन जाणारी कंपनीची कॅब रात्री आली नाही. दुसऱ्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती कॅनबे चौकातून पायी जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंतराचा मृत्यू झाला.

कॉल रेकॉर्डची तपासणी... अंतराच्या खूनप्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीचे आणि अंतराचे मोबाईलवरून आणखी कोणाकोणाशी संभाषण झाले, याची माहिती घेण्यासाठी मोबाईल कॉल तपासण्याचे काम सुरू आहे.