शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रश्मीकांत तोरणे अपहरण प्रकरणाचा दु:खद शेवट

By admin | Updated: July 14, 2016 00:45 IST

सोळा महिन्यांपूर्वी घडलेल्या बावडा येथील अपहरण करण्यात आलेल्या रश्मीकांत तोरणे याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

इंदापूर : सोळा महिन्यांपूर्वी घडलेल्या बावडा येथील अपहरण करण्यात आलेल्या रश्मीकांत तोरणे याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर, त्याने रश्मीकांतचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह जमिनीत गाडून टाकल्याची कबुली दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भारत ऊर्फ पिंटू तुकाराम सोनवणे (वय २२, रा. इंदिरानगर, बावडा) आहे. अक्षय ऊर्फ सोनू गौतम जगधने (वय २१, रा. बावडा, मूळ रा. घेरडी वाकी, ता. सांगोला), हर्षल ऊर्फ अनिकेत राजेंद्र बोरे (वय २०, रा. बावडा) अशी आज अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर संतोष ऊर्फ काळुराम राजेंद्र घोडके (वय २०), प्रवीण ऊर्फ पवन दुर्योधन जाधव (वय २१ वर्षे), विनोद अरुण झेंडे (वय २५, सर्व रा. बावडा), अक्षय ऊर्फ किशोर अर्जुन बागल (वय २१, रा. वडापुरी, ता. इंदापूर) अशी या प्रकरणात या पूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ज्येष्ठ पत्रकार व बावडा गावचे रहिवासी रमाकांत हरी तोरणे यांचा रश्मीकांत रजनीकांत तोरणे (वय १९, रा. बावडा) हा नातू आहे. तो बारावीमध्ये शिक्षण घेत होता. १५ मार्च पासून तो बेपत्ता होता. दि.२१ मार्च २०१५ रोजी तो बेपत्ता झाल्याची खबर रमाकांत तोरणे यांनी बावडा औट पोस्टला नोंदवली. त्यांनी काही आरोपींची नावेही पोलिसांना दिली होती. तपास काही लागत नव्हता. आरोपी सापडत नव्हते. त्यामुळे चार महिने वाट पाहिल्यानंतर चार महिन्यांनी तोरणे कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. २ जुलै २०१५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी संतोष ऊर्फ काळुराम घोडके, प्रवीण ऊर्फ पवन जाधव, अक्षय ऊर्फ किशोर जाधव, विनोद झेंडे या चौघा आरोपींविरुद्ध संगनमत करून जिवे मारण्याच्या उद्देशाने रश्मीकांतला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. दि. २७ जुलै २०१५ रोजी भारत सोनवणे वगळता इतरांना पकडण्यात पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना यश मिळाले. सोनवणे हा फरारी झाला. तो सापडत नव्हता. गुन्हा घडून एक वर्ष झाल्यानंतर तोरणे कुटुंबीयांनी पुण्यात जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. त्या वेळी इंदापूर पोलिसांकडून तपास काढून घेण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिले. अपहरण प्रकरण होऊन १६ महिने उलटून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तोरणे कुटुंबीयांनी पुन्हा दि. २८ जून २०१६ रोजी कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरूकेले. यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे विभागाकडे दिला.या प्रकरणाचा तपास केवळ बारा दिवसांपूर्वी हातात घेतल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, राजेश रामाघरे, हवालदार बाळासाहेब सकाटे, दयानंद लिमण, दत्तात्रय जगताप, अनिल वाघमारे, मुन्ना मुत्तनवार, पोलीस नाईक नीलेश कदम, प्रवीण मोरे, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विघ्नहर गाडे, चंद्रकांत वाघ यांच्या पथकाने संपूर्ण प्रकरण व घटनांच्या तपासाची माहिती घेतली. फरारी आरोपीचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले.आज सकाळी सहा वाजता इंदापूरमध्ये मुख्य आरोपी सोनवणे हा पथकाच्या जाळ्यात सापडला. एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याने याप्रकरणी कबुली दिली. बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार वर्षा लांडगे, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, मंडलाधिकारी संतोष अनगरे यांच्यासह सर्व फौजफाटा सकाळी सव्वादहा वाजता बावड्याकडे रवाना झाला.