शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीला अखेर मुहूर्त - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:29 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण समितीची स्थापना करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे़ नऊ सदस्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण समितीची स्थापना करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे़ नऊ सदस्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तसेच राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे जून २०१७ पर्यंत शिक्षण मंडळ अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.महापालिका आयुक्तांनी शिक्षण समिती बरखास्त केली होती. अधिकार आले संपुष्टात बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आले.दोन जूनला आयुक्तांनी शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. त्यांच्या अधिपत्याखालील मालमत्ता, कर्मचारवृंद स्वत:च्या अधिकारकक्षेत घेतले. गेल्या वर्षभर शिक्षण समिती अस्तित्वात आली नाही. मात्र यावर्षी नवीन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहेउत्सुकता सदस्यांच्या नावांचीनऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दिला असून, त्यामुळे सभापती, उपसभापती कोण होणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे. आशा शेंडगे, प्रियंका बारसे, प्रा. उत्तम केंदळे, सुवर्णा बुर्डे, सारिका सस्ते, सोनल गव्हाणे यांच्या नावाची चर्चा आहे. सभापतिपदासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची निवड केली जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या