शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण जैसे थे; पोलिसच हटविले

By admin | Updated: July 15, 2016 00:42 IST

अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांची संख्या महापालिकेने अचानक कमी केली आहे. तब्बल ३० सहायक फौजदारांना परत पाठविण्यात आले आहे.

पुणे : अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांची संख्या महापालिकेने अचानक कमी केली आहे. तब्बल ३० सहायक फौजदारांना परत पाठविण्यात आले आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन आहेच; पण फक्त त्याच कामासाठी म्हणून नियुक्त असलेल्या पोलिसांना आवश्यक सुविधा देण्याबाबतही त्यांनी चालढकल चालविली आहे.राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे काही वर्षांपूर्वी महापालिकेसाठी म्हणून स्वतंत्र पोलीस बळ देण्यात आले. त्यात एक सहायक पोलीस आयुक्त, ३ पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस फौजदार व उर्वरित पोलीस शिपाई असे तब्बल ८० पेक्षा जास्त मनुष्यबळ देण्यात आले. या सर्वांचे वेतन महापालिका अदा करीत असते. त्यासाठी मासिक काही लाख रुपये खर्च येतो. पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या गरजेनुसार त्यांना पोलीस बल पुरविण्यात येते. महापालिकेची हद्द विचारात घेता आहे तीच संख्या अपुरी असतानाही तब्बल ३० सहायक फौजदारांना पालिका प्रशासनाने परत पाठविले आहे. त्याचे वेतन देणे परवडत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.शिल्लक राहिलेल्या ५० जणांमध्ये सुमारे १० वरिष्ठ अधिकारी आहेत. ते प्रत्यक्ष कारवाईत कधीही भाग घेत नाहीत. उर्वरित ४० पैकी किमान ५ जण कार्यालयीन कामकाजासाठी म्हणून पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये त्यांना दिलेल्या एका दालनात बसलेले असतात. राहिलेल्या ३५ पैकी किमान १० जण साप्ताहिक सुटी, रजा यामुळे उपलब्ध नसतात. फक्त २५ पोलिसांमध्ये अतिक्रमणविरोधी विभागाला संरक्षण कसे देता येईल, याचा विचारच प्रशासनाने केलेला नाही. क्षेत्रीय कार्यालयांकडून पोलीस संरक्षणाची मागणी झाली की कार्यालयातील पोलिसांकडून मनुष्यबळ नाही असे सांगितले जाते व अतिक्रमणविरोधी विभाग तेच कारण देत विनाकारवाई बसून राहतात. (प्रतिनिधी)