विजेशिवाय उताराने (ग्रॅव्हिटीने) पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित होती. ही योजना १९६० पर्यंत सुरू होती. या योजनेत शहरात चिरेबंद व चुन्यात बनवलेल्या ८ पाण्याच्या टाक्या होत्या. यात वेताळ पेठेत मुख्यता पाण्याची टाकी होती, तर नगरपालिकेजवळील मंगळवार पेठेत, नागोबा आळी
बजरंग आळी, भोर पंचायत समितीजवळ टाक्या तर आमराई व इतर भागात हौद व पाण्याच्या टाक्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टाकी आणि धुण्यासाठी हौद तोडीव दगडात बांधलेले होते. या सर्व टाके आणि हौद मागील पाच वर्षांपर्यंत सुस्थितीत होते. मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी मंदिरे, घरे, दुकाने व हॉटेलचे अतिक्रमण झाले असून, यामुळे संस्थानकालीन पुरातन वस्तू नष्ट होत चालले आहेत.
संस्थानकालीन वस्तू पाण्याच्या टाक्या, हौद, संस्थानकालीन घाटावरील तोडीव दगडे नष्ट होत चालली आहेत. भोर शहरातील संस्थानकालीन पिण्याच्या पाण्याच्या व हौद यांच्या नोंदीबाबत माहिती घेऊन संबंधित ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल.
डाॅ. विजयकुमार थोरात, मुख्याधिकारी
भोर.न.पा
भोर शहरातील टाक्या हौद