शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगणक अभियंत्याने शेतातून दिला रोजगार

By admin | Updated: October 2, 2015 01:02 IST

संगणक अभियंता म्हणून शहरात ऐट मिरविण्याच्या, नोकरशाहीच्या जंजाळातून बाहेत पडून स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने करीत खेड्यातील एक युवक बघता-बघता उद्योजक बनला

रवी साकोरे, काळूस संगणक अभियंता म्हणून शहरात ऐट मिरविण्याच्या, नोकरशाहीच्या जंजाळातून बाहेत पडून स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने करीत खेड्यातील एक युवक बघता-बघता उद्योजक बनला. रूपेश आरगडे या तरुणाने प्रयत्नपूर्वक शेतीमध्ये काम सुरू केले व शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून परिसरातील १७० जणांना कायमचा रोजगारही मिळवून दिला आहे. काळूस (ता. खेड) येथे राहणाऱ्या या युवकाने पारंपरिक शेतीतील मधुमका (स्वीट कॉर्न) पिकावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारला. लहानपणापासूनच शेतीची आवड असलेला रूपेश संगणक अभियंता आहे. रूपेशचे वडील पारंपरिक शेतीबरोबरच मधुमका विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, या व्यवसायातील व्यापारी मंडळींच्या साखळीमुळे पिकातून म्हणावा तसा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. हे लक्षात आल्यावर याच मालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करता येईल का, असा विचार रूपेशने केला.बाजारपेठेतील उलाढालीची आणि व्यवसायातील तांत्रिक बाबींची बारकाईने माहिती घेतली. राष्ट्रीयीकृत बँकेच्या पिंपळगाव शाखेतून १ कोटी रुपयांचे कर्ज त्याने मिळविले. व्यवसायासाठीची यंत्रसामग्री इंडोनेशिया येथून खरेदी केली. नंतर व्यवसाय सुरू केला. आता या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल ३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. रूपेशने गावातील १२५ महिला व ५० पुरुषांना शाश्वत रोजगार मिळवून दिला आहे. स्थानिक मजुरांबरोबरच भंडारा, गोंदिया येथील मूळचे असणारे काही कामगारही येथे रोजंदारीवर काम करीत आहेत. दिवसभराच्या, कणसातील दाणे सोलून वेगळे काढण्याच्या कामातून मजुरांना २५० ते ३०० रुपये रोजगार मिळतो.