शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक बनलीय अनेकांसाठी रोजगाराचे साधन

By admin | Updated: January 8, 2017 03:35 IST

महापालिका निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि अद्याप एकाही पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली नसल्याने इच्छुकांना प्रचार करण्यासाठी पगारी कार्यकर्ते ठेवण्याची वेळ

पुणे : महापालिका निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि अद्याप एकाही पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली नसल्याने इच्छुकांना प्रचार करण्यासाठी पगारी कार्यकर्ते ठेवण्याची वेळ आली आहे. महापालिका निवडणुकीत अगदी घरा-घरापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मदतीने किमान आपले नाव तरी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाचे कार्यकर्ते यासाठी मिळणे अवघड झाल्याने अनेकांनी पगारी कार्यकर्ते नेमले आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी हे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रके वाटत आहेत. यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभागाचा विस्तार वाढला आहे. त्यातच आपल्यासोबत पक्षाकडून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत माहिती नाही. तरीही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणाही तितकीच सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी नियोजनबद्ध यंत्रणा राबविली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल, यानुसार नियोजन केले जात आहे. प्रभागात विविध कार्यक्रम राबविण्यासह मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. यंदा प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासह ‘हायटेक’ प्रचारालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. ‘गुड मॉर्निंग’पासून ते विविध सुविचार, संदेश या माध्यमातून प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचे टाकण्यात येणारे फोटो, त्याचे डिझाईन डिझायनरकडून करून घेतले जात आहे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी स्वतंत्र माणसे नेमण्यात आली आहेत. त्यामुळे यातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यासह परिचयपत्रके छापण्यात आली असून, ही पत्रके घरोघरी पोहोचविली जात आहेत. काही ठिकाणी इच्छुक स्वत: घरोघरी जात आहेत, तर काही जणांनी या कामासाठी रोजंदारीवर माणसे नेमली आहेत. तीनशे ते चारशे रुपये देऊन त्यांच्याकडून हे काम करवून घेतले जात आहे. प्रचारासाठी चारचाकी वाहनांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे इच्छुकांनी भाडेतत्त्वावर वाहने घेतली आहेत. महिनाभर प्रचारात मोठ्या प्रमाणात वाहनांचा उपयोग केला जात आहे. वाहनमालकाला रोजचे भाडे देण्यासह चालकालाही रोजगार मिळत आहे. (प्रतिनिधी)फ्लेक्स उभारणीसाठी जादा खर्चप्रचाराचा सर्वांत जास्त भर फ्लेक्सउभारणीवर असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुकाने प्रभागात फ्लेक्सउभारणीचा धडाका लावला आहे. दरम्यान, हे फ्लेक्सउभारणीचे काम करणाऱ्यांनादेखील रोजगार उपलब्ध झाला आहे. यासह मतदारयादी तयार करणे, स्लिप तयार करणे, विभागनिहाय माहिती ठेवणे या कामासाठीही माणसे नेमण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दिवसांत अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत असल्याचे दिसून येत आहे. इच्छुकांकडून यंदा ‘हायटेक’ यंत्रणेचा अवलंब केल्याचे दिसून येत आहे. मतदारयादीचा तपशील ठेवण्यापासून ते प्रचाराचे नियोजनदेखील लॅपटॉपच्या माध्यमातून केले जात आहे. विशिष्ट माहिती मिळविणे, मतदारांचे नाव, संपर्क क्रमांक संकलित करणे आदी कामे लॅपटॉपद्वारे केली जात असून, ही यंत्रणा राबविण्यासाठी काही जणांनी संगणक अभियंत्यांचीही मदत घेतली आहे. प्रचाराची सर्व यंत्रणा हाताळता यावी, यासाठी इच्छुकांनी प्रभागात कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयामध्येही किमान दोन ते तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे.