शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

महात्मा गांधी रोजगार हमीतून वर्षभरात ११ हजार लोकांना रोजगार

By admin | Updated: April 12, 2016 04:21 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१५ -१६ या वर्षात ८ कोटी ३९ लाख १० हजारांची कामे झाली असून ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला

पुणे : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २०१५ -१६ या वर्षात ८ कोटी ३९ लाख १० हजारांची कामे झाली असून ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२ हजार ३६५ लोकांनी काम मागितले होते. सध्या १ हजार १३७ लोकांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे.१ हजार ४०७ ग्रामपंचायतींपैकी ९५४ ग्रामपंचायतींनी काहीही कामे केलेली नाहीत़ दुुष्काळ निवारण आणि हाताला काम मिळावे, या मूळ उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. योजनेच्या १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील कामांची माहिती घेतली असता हे चित्र स्पष्ट झाले आहे़ जो कोणी काम मागेल त्याला वर्षभरात किमान १०० दिवस काम देण्याची अट घालण्यात आली आहे़ जिल्ह्यात १४४ गावांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. आता ८७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे़ त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांना रोजगार पुरविण्याचे संकट आहे़ या पार्श्वभूमीवर मनरेगाचा आढावा घेतला असता, नागरीकरण वाढत असलेल्या हवेली, मावळ, मुळशी या तालुक्यातून अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे या योजनेतून गेल्या वर्षी फक्त १८१ रुपये मजुरी मिळत होती. नागरीकरण वाढत असलेल्या तालुक्यात यापेक्षा जास्त मजुरी मिळत असल्याने या योजनेकडे लोकांचे दुर्लक्ष होत आहे. या योजनेंतर्गत गेल्या वर्षात ७ हजार ६५ कुटंबांनी रोजगार मागितला. यापैकी ६ हजार ४५४ कुटंबांना रोजगार देण्यात आला, तर १२ हजार ३६४ लोकांनी मागणी केली, त्यापैकी ११ हजार १२३ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.योजनेतून केली जाणारी कामेरोपवाटिका, शौचालय बांधकाम, नवीन विहिरी, शेततळे, रस्ता, वनराई बंधारा, वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, फळबाग लागवड, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, गारगोटे, कुक्कुटपालन शेड, गांडूळखत आदीसध्या १ हजार १३७ लोकांना कामगेल्या आठवड्यातील चालू कामांचा आढावा घेतला असता आंबेगावमध्ये १३५ (२२), बारामतीत १५३ (१२), भोरमध्ये ४७ (१४), दौंडमध्ये २५८ (३०), हवेलीत (६२) ६, जुन्नर २९१ (३५), खेडला ६० (७), मुळशी ११ (१), पुरंदर ८५ (१७), शिरूर ३५ (१६) अशा १ हजार १३७ लोकांना सध्या रोजगार उपलब्ध झाला आहे. १६० कामे सुरू आहेत.मजुरी जास्त मिळत नसल्याने या योजनेकडे लोक दुर्लक्ष करतात, तरी लोकांनी याचा लाभ घ्यावा. ग्रामपंचायतीशी संपर्क साधून ग्रामसेवकाकडून जॉबकार्ड काढून घ्यावे. मागेल त्याला रोजगार दिला जाईल.- नितीन माने, उपमुख्य कार्यकारीअधिकारी, ग्रामपंचायत