शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार महिलांमध्ये वाढली सुरक्षेची भावना; १ लाख महिलांनी केली ‘बडी कॉप’मुळे उत्स्फूर्तपणे नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 05:22 IST

छेडछाड, अश्लील शेरेबाजी, पाठलाग, नोकरीच्या ठिकाणी होणारे शोषण, लैंगिक सुखाची मागणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने होणारी हेळसांड यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो.

पुणे : छेडछाड, अश्लील शेरेबाजी, पाठलाग, नोकरीच्या ठिकाणी होणारे शोषण, लैंगिक सुखाची मागणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने होणारी हेळसांड यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा महिला खुलेपणाने तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. नेमकी हीच अडचण ओळखून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नोकरदार महिलांना सुरक्षा देण्याकरिता अभिनव उपक्रम राबवत ‘बडी कॉप’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तब्बल एक लाख महिलांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. ८०० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून या महिलांशी दैनंदिन संपर्क ठेवण्यात येत असून, त्यांच्या समस्या तातडीने सोडविल्या जात आहेत.संगणक अभियंता असलेल्या रसिला राजू हिचा हिंजवडीमध्ये सुरक्षारक्षकाने खून केला. त्यापूर्वी अंतरा दास या अभियंता तरुणीचाही खून झालेला होता. त्यानंतर आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उन्हा ऐरणीवर आला होता. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबत विचारविनिमय सुरू असतानाच बडी कॉपची संकल्पना समोर आली.आयुक्त शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांकडून महिलांचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप करण्यात आले. स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विविध कंपन्या, महाविद्यालयांमध्ये जाऊन या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाला प्रतिसाद मिळायला लागल्यावर त्याची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात आले. आयटी व्यतिरिक्त बँका, हॉटेल, कॉपोर्रेट्स आदी खासगी क्षेत्रातील आणि शासकीय नोकरदार महिलांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. कामाच्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बडी कॉप असणार आहे. हे कर्मचारी नेमून दिलेल्या महिलांच्या कोणत्याही अतितातडीच्या मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध आहेत.केवळ नोकरदार महिलांपुरते मर्यादित न राहता महाविद्यालयीन तरुणींच्या समस्या सोडवण्यासाठी बडीकॉप व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सुरू करण्यात आले. हा उपक्रम पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीन आणि चारच्या हद्दीमध्ये सुरू आहे. या भागातच सर्वाधिक कंपन्या आहेत.प्रसंग १चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलसेंटरमध्ये काम करणा-या तरुणीने बडी कॉप व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मदत मागितली. उपनिरीक्षक संदीप साळुंखे यांनी पथकासह तरुणीला फोन केला. काय मदत हवी ते विचारून घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी कामाच्या ठिकाणी काम करणारा 30 वर्षीय तरुण तिला ' तू छान दिसतेस, मला आवडतेस' असे म्हणत असल्याचे सांगितले. तसेच, तो तिला खानाखुणा आणि हावभाव करून त्रास देत होता. तिने याबाबत विचारणा केल्यावर त्याने अपशब्द वापरले होते. तिने कंपनीकडे तक्रार दिली होती. कंपनीने त्याला लेखी ताकीद दिली होती. मात्र, तरीही तो सुधारला नव्हता. ही तक्रार ऐकून घेताच पोलिसांनी तिची तक्रारार घेऊन चंदन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली.प्रसंग २खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील महिलांच्या स्वच्छता गृहामध्ये एक तरुण घुसला होता. त्याने एका महिलेला धक्का मारून त्यांचा विनयभंग केला होता. ही तक्रार प्राप्त होतात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी राजकमल राजबहादूर यादव या आरोपीला अटक केली.

प्रसंग 3कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहात असलेली महिला वडगाव शेरी येथे पतीच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी पतीने त्यांना मारहाण केली. त्यांना बाहेर ढकलून दिले. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पीडित महिलेने बडी कॉपवर तक्रार दिली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन महिलेला वैद्यकीय व अन्य मदत पुरवली. तसेच तिची तत्काळ तक्रार दाखल करून घेतली.प्रसंग ४चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात सायबर गुन्हे शाखेच्या निरीक्षक राधिका फडके यांनी बडी कॉप बाबत यांनी व्याख्यान दिले होते. प्राध्यापक अश्लील शेरेबाजी करीत असल्याचे, तसेच अत्याचार करीत असल्याची तक्रार केली. भीतीपोटी तक्रार करीत नव्हतो, पण व्याख्यानामुळे हिंमत आल्याचे सांगत एका तरुणीने तक्रार दाखल केली. तक्रारदार तरुणीसोबत अश्लील शेरेबाजी, अंगलट येणे असे करून बदनामी केली होती. व्याख्यानानंतर तक्रार देण्याचे धाडस या तरुणीने दाखवले. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याच्या वतीने जागेवरच तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.