शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांची उदासीनता

By admin | Updated: October 15, 2014 05:11 IST

मतदारवाढीसाठी जोमाने प्रयत्न करणा-या जिल्हा प्रशासनाला सरकारी कर्मचारी, शिक्षक व पोलिसांच्या टपाली मतदान टक्केवारीची तिशी गाठण्यातही अपयश येणार असल्याचे चित्र आहे

पुणे : मतदारवाढीसाठी जोमाने प्रयत्न करणा-या जिल्हा प्रशासनाला सरकारी कर्मचारी, शिक्षक व पोलिसांच्या टपाली मतदान टक्केवारीची तिशी गाठण्यातही अपयश येणार असल्याचे चित्र आहे. टपाली मतदानासाठी पात्र असलेल्या ४६ हजार २२२ मतदारांपैकी केवळ २४ हजार २११ मतदारांनी मतदान अर्ज भरून दिला असून, सोमवारपर्यंत (दि.१३) केवळ ४३० मतदारांनी टपाली मतदान केले होते. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या सरकारी कर्मचारी, शिक्षक व पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी टपाली मतदानाची सोय करून देण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या पहिल्या प्रशिक्षणादिवशी फॉर्म १२ चे वाटप करण्यात येते. यात मतदाराची संपूर्ण माहिती, पत्ता व मतदारसंघ नमूद करावा लागतो. त्यानंतर दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी हा अर्ज जमा करून घेतला जातो. त्यानुसार संबंधितांना मतपत्रिका (पोस्टल बॅलट) पाठविण्यात येते. जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील १० हजार ६०० जवानांना टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज पाठविले होते. मतदानाच्या कामातील ४६ हजार २२२ कर्मचाऱ्यांना मतदानाचा फॉर्म देण्यात आला होता. त्यातील २४ हजार २२२ कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून दिले. त्यानुसार सैनिक व कर्मचाऱ्यांना २९ हजार ८४८ मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील केवळ ४३० जणांचे टपाली मतदान प्राप्त झाले आहे. यातून सरकारी कर्मचाऱ्यांची मतदान करण्याची उदासीनता दिसून येत आहे. सैनिक, शिक्षक, पोलीस आणि महसूल विभागांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मतदारसंघनिहाय माहिती गोळा केली होती. त्यानुसार शिक्षक, महसूल कर्मचारी व १५ हजार पोलिसांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)