शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे पाळणाघर कर्मचाऱ्यांना झाले नकोसे

By admin | Updated: March 23, 2016 01:31 IST

महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या पाळणाघराला पालिकेतील कर्मचाऱ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

पुणे : महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या पाळणाघराला पालिकेतील कर्मचाऱ्यांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सुमारे २० वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर चालविण्यात येते. शहराच्या मध्यवस्तीत गावठाण भागात असणाऱ्या या पाळणाघराचा उपयोग मात्र पालिका कर्मचारी का करीत नाहीत, याची लोकमत प्रतिनिधीने पाहणी केली असता हे चित्र समोर आले. अतिशय स्वच्छ आणि उत्तम सुविधा तसेच अतिशय किमान शुल्क आकारले जात असताना कर्मचारी आपल्या मुलांना या ठिकाणी का ठेवत नाहीत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.४० मुलांची क्षमता असणाऱ्या या पाळणाघरात सध्या केवळ १४ जणांचा पट आहे. त्यातीलही केवळ तीनच जण पालिका कर्मचाऱ्यांची मुले आहेत. पालिकेतून येणारा प्रतिसाद लक्षात घेता, या ठिकाणी बाहेरील मुलांनाही प्रवेश देण्यात येत असल्याचे या पाहणीतून समोर आले. सध्याही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा काही जण आजारी असल्याने केवळ ४ जणच या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसले. पाळणाघरात महापालिकेच्या जवळच पालिकेची कै. लालबहाद्दूर शास्त्री माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या आवारातच पाळणाघराची अतिशय उत्तम सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक मोठा हॉल, खेळणी आणि पाळण्यांची एक खोली, स्वयंपाकघर व आजूबाजूला मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा, असे उत्तम आवार असताना या पाळणाघराकडे पालिकेतील कर्मचारी का पाठ फिरवतात, हा खरा प्रश्न आहे. याचबरोबर, मुलांना ८ तास या पाळणाघरात ठेवण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याला केवळ १०० रुपये इतका कमी दर आकारला जातो. त्यामुळे खासगी पाळणाघरांमध्ये आपल्या पाल्यासाठी हजारो रुपये देणारे पालक पालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या या पाळणाघराला का पसंती देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. अतिशय स्वच्छ असलेल्या या पाळणाघरात महापालिकेच्या दोन सिस्टर दोन पाळ्यांमध्ये काम करतात. याचबरोबर ४ महिला कर्मचारी येथे मुलांकडे लक्ष देणे आणि जागेची स्वच्छता करणे अशी कामे दोन पाळ्यांमध्ये करतात. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांवर आणि इतर सुविधांवर महापालिका खर्च करीत असतानाही पालिकेतील कर्मचारी त्याचा फायदा घेत नसल्याचे लक्षात येते.तसेच, या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी फारशा विशेष अटी नाहीत. वर्षभरात कोणत्याही महिन्यात काही ठराविक कागदपत्रे जमा करून येथील प्रवेश घेता येऊ शकतो. सहा महिन्यांपासून ते ५ वर्षांपर्यंतची मुलांना येथे प्रवेश दिला जातो. आपल्या पाल्याला संभाळण्यासाठी इतकी चांगली सोय महापालिका देते.