शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्याकडून आगार व्यवस्थापकांना जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST

--- बाभूळगाव : वरिष्ठांना तक्रारीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी इंदापूर येथील एका एसटी कर्मचाऱ्याने इंदापूर आगार व्यवस्थापाकांना त्यांच्या घरात ...

---

बाभूळगाव : वरिष्ठांना तक्रारीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी इंदापूर येथील एका एसटी कर्मचाऱ्याने इंदापूर आगार व्यवस्थापाकांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. घराच्या बाहेरील सुरक्षारक्षकालाही त्यांनी धक्काबुक्की केली आणि एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दादा संभाजी माने (रा. सुरवड, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आगार व्यवस्थापक महीबूब अब्दुल मजीद मनेर हे २२ मे रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानी असताना अचानक दादा माने हा दारूच्या नशेत तेथे आला. आगारात येऊन माझा अहवाल वरिष्ठांना सादर का केला, असे म्हणत शिवीगाळ केली आणि मला नोकरीची गरज नाही, मी तुझा मर्डर करणार, सकाळपर्यंत तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

त्या वेळी सुरक्षारक्षक दीपक व्यवहारे याने दादा माने याला अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही दमदाटी व धक्काबुक्की केली. आगारातील महिला कर्मचारी यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर सुरक्षारक्षक घटनास्थळी आल्यावर आरोपी रिक्षात बसून निघून गेला. काही वेळाने पुन्हा येऊन दमदाटी करून धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

————————————————