सोमेश्वरनगर : नोव्हेंबर महिना उजाडण्याची वेळ आली, तरीही अजून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा साखर हंगाम लांबला आहे. अजून राज्यात नवीन सरकार स्थापन न झाल्याने त्यांच्या संपाचे घोंगडे अजून भिजतच पडले आहे.
ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्र राज्य तोडणी व वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र त्यांनंतर चालू झालेली आचासंहिता त्यानंतर निवडणुका व आता सरकार स्थापनेला होत चाललेला उशीर यामुळे संपाचे घोंगडे भिजत पडले आहे. नवीन सरकारस्थापन न झाल्याने संपाबाबत चर्चा कोणाशी करायची, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिका:यांना पडला आहे.
यामध्ये कारखाना व संघटना यांच्यातील सामंजस करार संपून गेला आहे, ऊसतोडणी कामागरांना ऊसतोडणी मध्ये वाढ करावी, डिङोलचे दर वाढल्याने वाहतूकीमध्ये वाढ करावी, मुकादामांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, राज्यातील प्रत्येक कारखान्याने ऊसतोडणी कामागरांचा दोन लाख रूपयांचा विमा उतरावा, मुकादमांच्या 2क् टकके फरक बीलातील कमिशन द्यावे, ऊसातोडणी कामागरांच्या मुलांना निवासी आश्रमशाळा चालू कराव्यात, करारानुसार टायर बैलगाडीवर 1क् टकके कमिशन आकरणी ठरलेली असताना कारखाने 2क् टकके आकरतात. उर्वरीत पैसे परत मिळावेत. ऊसतोडणी व वाहतूकदार यांच्याकडून कपात केला जाणारा 2 टकके प्राप्तीकर करू नये, ऊसतोडणी कामगारांना शासनाने पककी घरे बांधून द्यावीत, त्यांना अडय़ाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व लाईट पुरवावी, मुकादमांना राज्यशासनाच्या कामगार विभागामार्फत ओळखपत्रे देण्यात यावीत. ऊसतोडणी कामगरांच्या मुलांना शासकीय व निम शासकीय क्षेत्रत नोकरीत आरक्षण द्यावे, या ऊस तोडणी कामगारांच्या मागण्या आहेत.
दरम्यान, गळीत हंगामाबाबत अनिश्चितता वाढल्याने कारखानदार व ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. चालू वर्षी राज्यात ऊसाचे क्षेत्र जादा असून राज्यातील साखर कारखान्यांपुढे सुमारे 8क्क् ते 85क् लाख टनांच्या आसपास ऊसगाळपाचे उदिष्ट आहे. त्यासाठी कारखाने लवकर सुरू होणो अत्यंत गरजेचे आहे. गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांनी 675 लाख टन ऊसाचे गाळप केले होते.
4येणा:या हंगामात मात्र गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत एक लाख ते दीड लाख टन उसाचे जादा गाळप करावे लागणार आहे. तसेच,पुणो जिल्ह्यातील 16 कारखान्यांपुढे 9क् ते 95 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
4 घोडगंगा व विघ्नहर कारखाने चालू झाले आहेत. मात्र इतर कारखाने संपामुळे अजून चालू झाले नाहीत. त्यामुळे संप मिटण्यासाठी आठ दिवस तरी लागतील. त्यामुळे ऊसतोडणी कामागर कारखान्यावर येण्यास 1क् नोव्हेंबर उजाडू शकते. कारखाने, शेतकरी व ऊसतोडणी कामगरांचाही तोटा होणार आहे.
4चालू वर्षी अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रत ऊसाचे जादा क्षेत्र असल्याने कारखाने मे महीन्यार्पयत चालण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच थंडी संपताच मार्च महीन्यानंतर कारखाना व ऊसतोडणी कामागरांना प्रत्येक दिवस जिकरीचा ठरतो.
4 उन्हाच्या झळया वाढल्याने ऊसातेडणी कामागरांकडून अपेक्षीत ऊसाची तोड होत नाही. परीणामी कारखान्यांवर कमी प्रमाणात ऊस येऊन हंगाम लांबतो. तसेच एप्रिल महिन्यांनंतर कामगार ऊस तोडणीसाठी शेतक:यांकडून जादा पैशाची
मागणी करतात.