शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा स्वरक्षणासाठी एल्गार

By admin | Updated: March 17, 2017 02:06 IST

धुळ्यातील डॉक्टरवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजूट केली आहे. स्वरक्षणासाठी एल्गार पुकारत असे प्रकार तातडीने रोखण्यासाठी

पुणे : धुळ्यातील डॉक्टरवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजूट केली आहे. स्वरक्षणासाठी एल्गार पुकारत असे प्रकार तातडीने रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन शासनाला करण्यात आले आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करीत तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी डॉक्टरांकडून निषेध रॅली काढण्यात आल्या. अनेक ठिकाणी दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात आली होती.धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रोहन म्हामुनकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी हल्ला केला. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. इंदापूर मेडिकल असोसिएशन शाखेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, या व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले आहे. मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर मगर, सचिव डॉ. मिलिंद खाडे, डॉ. राम आरणकर, डॉ. श्रेणीक शहा, डॉ. दत्ता गार्डे, डॉ. सागर दोशी, डॉ. रियाज पठाण व इतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांची भेट घेतली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नीरा-लोणंद शाखेतर्फे निषेध फेरी काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पालखीतळापासून निषेध फेरीला सुरुवात करण्यात आली. बुवासाहेब चौक, बारामती रस्ता, अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालयामार्गे पंढरपूर रस्त्यावरून नीरा पोलीस दूरक्षेत्रात पोलिसांना निवेदन देण्यात आले. या वेळी लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, उपाध्यक्ष डॉ. अविनाश शेळके, नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राम रणनवरे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र जैन, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजीव गांधी, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, नीरेच्या सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते. राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आज दवाखाने बंद ठेवून निषेध करण्यात आला. या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.दिलीप बांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व डॉक्टरांनी उस्फुर्तपणे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि दोषींवर कडक कारवाई होण्याची मागणी केली. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यासाठी दोषींवर डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी म्हणजे इतरांवरही कायद्याचा वचक राहील असे डॉ. बांबळे यांनी यावेळी सांगितले. आज धरणे आंदोलनबारामती : धुळे येथील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांनी देशभर तसेच राज्यात बंद किंवा मूक मोर्चे आयोजित केले आहेत. विविध ठिकाणी मोर्चाद्वारे या घटनेचा निषेध नोंदविला आहे. त्या घटनेचा निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर यांनी मुंबईत आझाद मैदानावर शुक्रवारी (दि. १७) आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव डॉ. पार्थिव संघवी, नियोजन समितीचे डॉ. अनिल पाचनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.