शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्तीविरोधात एल्गार

By admin | Updated: February 6, 2016 01:51 IST

शहरातील गर्दीमध्ये वेगाने दुचाकी चालविता येत नाहीत, त्यामुळे पुणेकरांवर हेल्मेटसक्ती लादू नये. प्रबोधनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करावे, मात्र सक्ती करू नये,

पुणे : शहरातील गर्दीमध्ये वेगाने दुचाकी चालविता येत नाहीत, त्यामुळे पुणेकरांवर हेल्मेटसक्ती लादू नये. प्रबोधनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करावे, मात्र सक्ती करू नये, अशी भूमिका घेत हेल्मेटसक्तीविरोधात शनिवारपासून सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा निर्णय हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. हेल्मेटसक्तीविरोधात मंडई येथील टिळक पुतळ््याजवळ शनिवारी सकाळी १०.३० वाजता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, भाजपाचे पदाधिकारी संदीप खर्डेकर, शांतिलाल सुरतवाला, बाळासाहेब रुणवाल, भोला वांजळे, धीरज घाटे, श्रीकांत शिळीमकर उपस्थित होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती, ड्रेनेजच्या झाकणांची दुरवस्था, अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर दुचाकी चालविण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या कारणांमुळे रस्त्यावरील दुचाकी चालविताना वाहनाचा वेग खूपच कमी राहतो. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये हेल्मेटसक्ती करण्यात येऊ नये, त्याऐवजी हेल्मेट घालण्याबाबत प्रबोधन करावे, अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली. हेल्मेटसक्ती ही एका रात्रीतून राबविली जाणे चुकीचे आहे. सर्व दुचाकीचालकांसाठी हेल्मेटची उपलब्धता सध्या बाजारात नाही. त्यामुळे हेल्मेटसक्ती पूर्वसूचना न देता राबविणे चुकीचे आहे, अशी मते या वेळी मांडण्यात आली. सक्तीमुळे हेल्मेट कंपन्या मालामाल होतील, अशी टीकाही या वेळी करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नाइलाजास्तव दुचाकी वापरणाऱ्या पुणेकरांवर हेल्मेटसक्ती अन्यायकारक ठरणार असल्याने याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मेधा कुलकर्णी यांनीही हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शविला. त्यांनी सांगितले, ‘प्रत्येक शहराची परिस्थिती वेगळी असते, पुणे शहरामध्ये हेल्मेटसक्ती लागू करणे योग्य होणार नाही.’> हेल्मेट कारवाईचा आलेख चढताचपुणे : वाहतूक पोलिसांनी जोमाने सुरू केलेली हेल्मेट कारवाई शुक्रवारी दिवसभर सुरूच होती. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचा आलेख शुक्रवारीही चढताच राहिला. दिवसभरात वाहतूक पोलिसांनी ५ हजार ५४४ वाहनचालकांवर कारवाई करीत तब्बल ५ लाख ५८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुुक्त सारंग आवाड यांनी दिली. शुक्रवारचा आकडा गुरुवारच्या तुलनेत ८२७ ने वाढला आहे, तर दंडाची रक्कम ८१ हजार १०० रुपयांनी वाढली आहे. काही वाहनचालकांसोबत पोलिसांचा वादही दिवसभर सुरूहोता.