शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश : दुसऱ्या फेरीत सर्वांनाच संधी

By admin | Updated: July 16, 2017 03:54 IST

इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप आॅनलाईन अर्ज न केलेल्या तसेच अर्जाचा दुसरा भाग अपूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये अद्याप आॅनलाईन अर्ज न केलेल्या तसेच अर्जाचा दुसरा भाग अपूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाच्या दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम, इतर माहितीत बदल करता येणार असून, त्यासाठी दि. १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतील पहिली प्रवेश फेरी शुक्रवारी पूर्ण झाली. या फेरीत ४८ हजार ३१५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी २४ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिला पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या १९ हजार ९८९ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. समितीच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. या फेरीत अद्याप आॅनलाईन अर्ज न केलेले, दुसरा भाग अपूर्ण भरलेले तसेच पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. आॅनलाईन अर्ज भरणे तसेच अर्जात बदल करण्यासाठी दि. १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अर्जात बदल करण्यासाठीही लिंक सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे दहावीचे बैठक क्रमांक ब्लॉक केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन माहिती पुस्तिका घेऊन नव्याने पुन्हा अर्ज भरू नये, असे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले. असा बदला पसंतीक्रम -विद्यार्थ्यांना आपल्या लॉगीनमध्ये जाऊन माय प्रोफाईल यातील एडिट युवर चॉईस या लिंकवर जावे लागेल. पसंती क्रमात बदल करण्यापूर्वी प्रिंट या बटनवर क्लिक करू नये. अन्यथा जुने पसंतीक्रम कायम राहतील. चॉईस फॉर सेंट्रलाईज्ड या पानावर पसंतीक्रमांचा क्रम बदलणे किंवा यापैकी काही काढून टाकणे किंवा काही नव्याने समाविष्ट करणे या प्रकारचे बदल करता येतील. आवश्यक बदल केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करावे. हे बदल मान्य आहेत का, अशी विचारणा होईल. मान्य असल्यास ओके बटनवर क्लिक करावे. नसल्यास कॅन्सल करून नव्याने बदल करावेत. भाग २ अपूर्ण भरलेले विद्यार्थीया विद्यार्थ्यांनी जवळच्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन आपला भाग १ अ‍ॅप्रुव्ह करून घ्यावा. त्यानंतर लॉगीनमधील माय स्टेटसमध्ये जाऊन भाग २ भरता येईल. भाग २ नोंदणीमध्ये सुरुवातीला दहावीच्या परीक्षेत विज्ञान विषयातील १००पैकी मिळालेले गुण भरावेत. त्यानंतर आवश्यक माहिती व पसंतीक्रम भरून अर्ज सेव्ह करावा.अद्याप आॅनलाईन अर्ज न भरलेले विद्यार्थीअद्याप आॅनलाई अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका घेऊन त्यातील लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून लॉगइन करावे. माहिती पुस्तिकेतील सूचनांप्रमाणे भाग १ पूर्ण करावा. त्यानंतर मार्गदर्शन केंद्रांकडून आवश्यक कागदपत्रे दाखवून व तपासून अ‍ॅपु्रव्ह करून घ्यावा. त्यानंतर अर्जाचा भाग २ व पसंतीक्रम भरता येतील.