शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीसह अकरा गावांत उद्यापासून संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा व अन्य प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत ...

आळंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळा व अन्य प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि.२८) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डुडुळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक, चोविसावाडी अशा अकरा गावांत ४ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात आळंदीत प्रवेश मिळणार नाही.

आळंदीत माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. जेष्ठ वैद्य अष्टमी अर्थातच २ जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी मुख्य समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यात फक्त १०० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. मात्र, अनेकजण प्रस्थान सोहळ्याला आळंदीत येत असतात. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून प्रस्थान सोहळा कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या कालावधीत आळंदीकडे येणारी खाजगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, यात्रीभवन, लॉज, हॉटेल व मठात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर पवित्र इंद्रायणी घाटावर २० जुलैपर्यंत फिरण्यास तसेच स्नान करण्यास मज्जाव केला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच सोहळा पासधारकांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

फोटो : माऊलींची समाधी.