शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजेची कामे लागली मार्गी

By admin | Updated: January 20, 2016 01:24 IST

महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पनेमुळे बारामती मंडलातील वीज यंत्रणेसंबंधीच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे

बारामती : महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पनेमुळे बारामती मंडलातील वीज यंत्रणेसंबंधीच्या अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे. मंडलामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुमारे दीड हजाराहून अधिक कामे झाली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना गावोगावी वीज पोहोचली. अनेक गावांत तीस ते चाळीस वर्षे जुनी यंत्रणा आहे. कमकुवत तारा, झिजलेले खांब, उघडे फ्यूज बॉक्स यामुळेच ग्रामीण भागात विद्युत अपघाताच्या घटनांचा धोका वाढला होता. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे ऊस जळाल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली.याबाबत सातत्याने महावितरणकडे तक्रारी होत होत्या. वाढत्या तक्रारी आणि समस्यांची गंभीर दखल घेत महावितरणने ‘एक गाव एक दिवस’ संकल्पना राबबून त्या गावातील वीज यंत्रणेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मंडलात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर, शिरूर, पुरंदर आदी तालुक्यांत कामे सुरू आहेत. या मोहिमेत रोहित्राच्या पेट्या दुरुस्त करणे, किटकॅट, वीज खांब बदलणे, सैल वीजवाहिन्यांचे गाळे ओढणे, उच्च दाब वाहिनीस तसेच लघुदाब वाहिनीस गार्डिंग करणे, नादुरुस्त मीटर बदलणे, कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ग्राहकांची पडताळणी करणे, शून्य ते तीस युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांची तसेच मीटर रीडिंग उपलब्ध नसलेल्या ग्राहकांची तपासणी करणे, वीजचोरी व अनधिकृत वीजवापराची प्रकरणे उघडकीस आणणे, वीजबिलाची थकबाकी वसूल करणे, वाहिन्यांच्या गाळ््यांना स्पेसर बसविणे, लघुदाब वाहिनीस जंपरिंग करणे, रोहित्र बदलणे, नवीन वीजजोड देणे, वीजवाहक तारा बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती करणे आदी कामे यांमधून करण्यात येत आहेत.या मोहिमेत अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, मदन शेवाळे, शिवाजी वायफळकर यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते व जनमित्रांनी सहभाग घेतला.