शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बिजली...! सौरप्रकाशात उजळली पदरवाडी

By admin | Updated: May 5, 2017 02:22 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकरपासून सुमारे ५ किमीवर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर खोल डोंगरदरीत वसलेल्या पदरवाडीला रिचर्स फाउंडेशन

कांताराम भवारी /  डिंभेश्रीक्षेत्र भीमाशंकरपासून सुमारे ५ किमीवर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर खोल डोंगरदरीत वसलेल्या पदरवाडीला रिचर्स फाउंडेशन व आखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून १ मे रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून येथील प्रत्येक घरात सौरदिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे वर्षानुवर्षे अंधारात जीवन कंठणाऱ्या येथील आदिवासींची घरे सौर प्रकाशाच्या उजेडात उजाळून निघाली आहेत.श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या पश्चिमेला खोल दरीत सुमारे १४ ते १५ आदिवासींची घरे असणारी पदरवाडी. भीमाशंकर अभयारण्यातून रास्ता काढत या वस्तीवर जावे लागते. खालच्या बाजूने उंच कोकण कडा व वरील बाजूनेही डोंगराचा मोठा भाग मध्येच निर्माण झालेल्या माचीमध्ये (डोंगराचा सपाट भाग) गेल्या अनेक वर्षांपासून पदरवाडीची लोक आपले जीवन कंठीत आहे. या वस्तीवर जाण्यासाठी कोणत्याच बाजूने रस्ता नाही व भविष्यात होण्याची चिन्हे नाहीत. उदरनिर्वाहासाठी येथील नागरिकांना सुमारे पाच कि.मी.चढन चढून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे यावे लागते.शिडीचा घाट उतरून येथील गावकरी खाली कोकणात जातात. खोल दरीतून उतरण्यासाठी येथे पायऱ्या पायऱ्यांची शिडी लावण्यात आली असून येथून ये-जा करणे अतिशय धोकादायक आहे. मुंबई व कोकणमार्गे काही पर्यटक भीमाशंकरला येण्यासाठी याच शिडी मार्गाचा वापर करत असताना पाहावयास मिळते.दुर्गम भागात वसलेल्या या पदरवाडीस वर्षानुवर्षापासून लाईटची कोणत्याच प्रकारची सोय नसल्याने पदरवाडीची जनता अंधारात दिवस काढत होती. काही वर्षापूर्वी येथे सौर प्रकाशावर चालणारे दिवे बसविण्यात आले होते. मात्र, प्रत्येक घरात लाईट नव्हती. रिसर्च फौंडेशन पुणे यांच्या माध्यमातून १ मे रोजी महाराष्ट्र व कामगारदिनाचे औचित्य साधून येथील १४ घरांमध्ये सौर दिवे बसण्यिात आले आहेत.यामुळे वर्षानुवर्षे अंधकारमय जीवन कंठणाऱ्या पदरवाडीच्या नशिबी असणारा अंधकारमय जीवन काही अंशी प्रकाशमय होण्यास मदत झाली आहे.