शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दरकवाडीत वीज कोसळून एक ठार

By admin | Updated: May 12, 2016 01:26 IST

बुधवारी पुणे जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.खेड तालुक्यातील दरकवाडी येथे वीज कोसळल्याने मार्तंड कोंडीभाऊ वाडेकर

पुणे : बुधवारी पुणे जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.खेड तालुक्यातील दरकवाडी येथे वीज कोसळल्याने मार्तंड कोंडीभाऊ वाडेकर (वय ३५, रा. वाडा) या युवकाचा मृत्यू झाला. तर बारामतीतील काऱ्हाटी परिसरात गोट्यावर वीज पडून एका गाईचा मुत्यू झाला. तर चार गायी होरपळल्या आहेत.जिल्ह्यातील बारामतीसह आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची कांदा पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. तसेच दुचाकी चालकांची अचानक आलेल्या पावसाने त्रेधातिरपिट उडाली. अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेले नागरिक या पावसामुळे सुखावले आहे. तसेच काही भागांमध्ये गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते. या पाण्यामध्यून वाहनचालकांना कसरत करत आपली वाहने काढावी लागत होती.काऱ्हाटी (ता बारामती) परिसरात गोट्यावर वीज पडून एका गाईचा मुत्यू झाला. तर चार गायी होरपळल्या आहेत. बुधवारी (दि. ११) दुपारी ३ च्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये कविता गजानन लोणकर यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्याने पेट घेतला. यावेळी कमी प्रमाणात पाऊस असताना देखील गोट्याने पेट घेतला. काही अंतरावरील जेसीबी यंत्रावर काम करणारे संदिप जगताप, रणजित जगताप, तात्या लोणकर, गंगाधर लोणकर या कामगारांनी या ठिकाणी धाव घेतली. गोट्याने पेट घेतल्याचे पाहून तातडीने हालचाली सुरू केल्या. अक्षरश: तडफडणाऱ्या पाच गायींच्या साखळया तोडुन आगीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. गोट्यात पाच मोठया, दोन लहान गायी होत्या. तसेच विजया महादेव खंडाळे यांच्या घरावरील पत्रा उडुन दोनशे मिटर अंतरावर जाऊन पडला. पाऊस थोडा पण वादळ जास्त होते. (प्रतिनिधी)