शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा फुगविल्या, शासनाने निश्चित केल्यापेक्षा अधिक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:46 IST

शासनाने ‘जीईएम, जीओव्ही’ निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने महापालिकेने इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

पुणे  - शासनाने ‘जीईएम, जीओव्ही’ निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने महापालिकेने इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.महापालिकेच्या शहरातील ३२ शाळांमध्ये आॅडिओ, व्हिडीओ यंत्रणा पुरविणे व बसविणे, मल्टिमीडिया एलसीडी प्रोजेक्टर आदी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. शासनाने आॅनलाईन ‘जीईएम, जीओव्ही’वर ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा निविदेत नमूद केलेल्या किमती अतिशय जास्त असल्याचे पुरावे सजग नागरिक मंचाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे इलेक्ट्रिकल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदातातडीने रद्द करा, असे लेखी पत्र सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.याबाबत वेलणकर यांनी सांगितले, की महापालिका प्रशासनाने एक स्वतंत्र समिती गठीतकरून महापालिकेच्या सर्व ‘डीएसआर’मधील वस्तूंच्या किमतीची ‘जीईएम, जीओव्ही’शी तुलना करून अंतिम डीएसआर निश्चित केले पाहिजेत. यामुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपये वाचू शकतील.निविदा फुगविणाऱ्याअधिकाºयांना निलंबित कराप्रशासनामध्ये बसलेल्या अधिकाºयांनी महापालिकेच्या पैशाची बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु निविदा फुगवून महापालिकेला तब्बल १९ लाख रुपयांचे नुकसान करणाºया अधिकाºयांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे.निविदा व शासनाने निश्चित केलेले दरउपकरण निविदाचे दर जीईएमवरील दरएॅम्प्लिफायर १७३८९ ९६८४कॉर्डलेस मायक्रो फोन १८५०० ३२३१मल्टिमीडिया एलसीडी ९८५०० ३१७५० 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या