शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या नोंदींमुळे पुण्याची मतदारयादी इंद्रधनुषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:46 IST

- नेहा सराफ । लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तृतीयपंथी, लिंगबदल करून घेतलेल्या, समलैंगिक (एलजीबीटी) व्यक्तींना भारतीय समाजात आजही प्रतिष्ठा ...

- नेहा सराफ ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तृतीयपंथी, लिंगबदल करून घेतलेल्या, समलैंगिक (एलजीबीटी) व्यक्तींना भारतीय समाजात आजही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यामुळेच सार्वजनिक जीवनात या मंडळींना फारसे स्थान नसते. ही परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचे मतदार यादीवरून आणि राजकीय पक्षांच्या प्राधान्यांवरून दिसू लागले आहे. पुण्याच्या यापूर्वीच्या मतदारयादीत तृतीयपंथीयाची एकमेव नोंद होती. यंदाच्या मतदारयादीत ती थेट १३९ वर गेली आहे.

वास्तवात एलजीबीटी समूहातील व्यक्तींची संख्या याहून अधिक आहे. मात्र जागरूकतेचा अभाव, सामाजिक दडपण, वाळीत टाकण्याची भीती आदी कारणांमुळे एलजीबीटी व्यक्ती उघडपणे समाजासमोर येत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, की एलजीबीटींची मतदार नोंदणी न होण्यामागे त्यांची नकारात्मकता कारणीभूत नाही. ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्र नसल्याने इच्छा असूनही अनेकांचे नाव यादीत येत नाही. कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक तृतीयपंथी उदरनिर्वाहासाठी पुण्यात येतात. त्यांच्याकडे पुण्यातल्या रहिवासाचा दाखला नसतो. पण सध्या आधारकार्डाची सक्ती झाल्याने अनेकांनी ओळखपत्र करून घेतले. त्यामुळे मतदार नोंदणी वाढली.

एलजीबीटी समूहाला समाजाने स्वीकारावे, यासाठी पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये चळवळ सुरु झाली आहे. त्यामुळे राजकीय स्तरावर एलजीबीटींना प्रतिनिधित्व देण्याचीही सुरुवात झाली आहे. काँग्रेसने तृतीयपंथी व्यक्तीला पक्ष संघटनेत स्थान देत सोनाली दळवी यांच्याकडे सरचिटणीसपद सोपवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांदणी गोरे यांना शहर उपाध्यक्षपदी नेमले आहे. दिशा शेख यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्तेपद आले आहे.समाजातल्या एलजीबीटी व्यक्तींचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे या वर्गासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सांगतात. मात्र समाजाकडून दडपण, बहिष्कार, हिंसा, घृणा वाट्याला येण्याच्या भीतीतून त्या व्यक्त होत नाहीत. समलैंगिक स्त्रिया (दीड टक्के), समलैंगिक पुरुष (तीन टक्के), उभयलिंगी (पाच टक्के), तृतीयपंथी-लिंगबदल (दर दोनशे व्यक्तींमागे एक) असे आहेत.

तृतीयपंथीयांच्या हाताला काम देण्याची गरजतृतीयपंथीयांच्या हाताला काम अर्थात त्यांना नोकºया देण्याची जास्त गरज असल्याचे तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आप्पा पुजारी यांनी सांगितले. ते म्हणाले, की राजकीय पक्षात प्रवेश देणे ठीक आहे; पण शिक्षण घेऊनही भीक मागण्याची वेळ अनेकांवर येते.शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. पुण्यातल्या तृतीयपंथींची संख्या १३९ पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते मतदार होऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रशासन काय करते, असा सवालही पुजारी यांनी केला.तृतीयपंथीयांच्या हाताला काम देण्याची गरज४तृतीयपंथीयांच्या हाताला काम अर्थात त्यांना नोकºया देण्याची जास्त गरज असल्याचे तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ते आप्पा पुजारी यांनी सांगितले. ते म्हणाले, की राजकीय पक्षात प्रवेश देणे ठीक आहे; पण शिक्षण घेऊनही भीक मागण्याची वेळ अनेकांवर येते.४शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. पुण्यातल्या तृतीयपंथींची संख्या १३९ पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्याने ते मतदार होऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रशासन काय करते, असा सवालही पुजारी यांनी केला.