शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या कार्यक्रमांतही निवडणुकीचे पडघम

By admin | Updated: January 24, 2016 02:04 IST

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. शहरात होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या, तसेच इतर छोट्या-मोठ्या

पिंपरी : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. शहरात होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या, तसेच इतर छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधील भाषणांमध्ये राजकीय नेते निवडणूक डोळ्यांसमोर धरून वक्तव्य करू लागले आहेत. पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात महापालिका निवडणूक होईल. त्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी झाली सुरू आहे. यंदाची निवडणूक द्विसदस्यीय प्रभागपद्धतीने होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रससह भाजपा, शिवसेना, काँगे्रस यांनीही कंबर कसली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शहरात लक्ष घालण्यास सुुरुवात केली आहे. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची शहरात वर्दळ सुरू झाली आहे. शहरातील सध्याच्या राजकीय स्थितीसह विविध घटनांचा आढावा घेतला जात आहे. तसेच अप्रत्यक्षरीत्या उमेदवारांचीदेखील चाचपणी सुरू आहे. यापूर्वी राजकीय नेते शहरात आल्यानंतर विकासाच्या मुद्द्यांवर बोलत. आता प्रतिस्पर्ध्यांवर टीका-टिप्पणी होऊ लागली आहे. वक्तव्य करून गेलेल्या नेत्याला संबंधित नेत्याचे प्रत्युत्तर तयार असते. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच नेत्यांनी पक्षबांधणीला महत्त्व दिले आहे, तर इच्छुक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची लगबग, लुडबुड वाढली आहे. प्रभागाची रचना कशी असेल, कोणता भाग कोठे जोडल्यास आपल्याला फायदा होईल, मतदारयाद्यांची चाचपणी आदी कामे सुरूझाली आहेत. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एखादा कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या स्थानिक नेत्याला निमंत्रित करण्याचा फंडा अवलंबिला जात आहे. (प्रतिनिधी)