..........
गडकिल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : शिवसाई युथ फाउंडेशनच्या वतीने गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले. शहरातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साई सयाजी मित्र मंडळ, वारजे यांनी पहिला क्रमांक मिळविला. दुसरा क्रमांक श्रुतिका निंगुणे, तिसरा दुर्गराज प्रतिष्ठान, कर्वे रस्ता यांनी पटकाविला. ही माहीती साईराज पगडे यांनी दिली.
-----
विद्या महामंडळ संस्थेचा वर्धापनदिन
पुणे : विद्या महामंडळ संस्थेचा ५९ वा वर्धापनदिन (दि. १) साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन आणि संस्थेचे संस्थापक पु.ग. वैद्य यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, सेवक उपस्थित होते. ही माहिती संचालक डॉ. अ. ल. देशमुख यांनी दिली.
--
७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम ५ डिसेंबर पासून
पुणे : निरंकारी सद्गुरु सूदीक्षा महाराज यांच्या आशीर्वादाने या वर्षीचा ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात ५ते ७ या कालावधीत आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रसारण संत निरंकारी मिशनच्या बेवसाईटवर संध्याकाळी ५ ते ९.३० यावेळेत केले जाईल.