शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
8
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
9
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
10
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
11
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
12
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
13
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
14
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
15
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
16
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
17
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
18
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
19
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
20
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले

पोटनिवडणुकीत ४६.०९ टक्के मतदान

By admin | Updated: January 11, 2016 01:32 IST

काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दिवसभरात ४६.०९ टक्के मतदान झाले.

पिंपरी : काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी दिवसभरात ४६.०९ टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी निकाल असून, एका तासात चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिकेची प्रभाग क्रमांक २६ ‘अ’ (काळभोरनगर) ही जागा रिक्त झाल्याने रविवारी या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसह, भाजपा, शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान झाले. या प्रभागात एकूण १८ हजार ३२६ मतदार असून, यापैकी ८ हजार ४४६ जणांनी रविवारी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ४ हजार ७०७ पुरुषांचा, तर ३ हजार ७३९ महिलांचा समावेश आहे. अशाप्रकारे दिवसभरात एकूण ४६.९ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत २ हजार ८६१ जणांनी मतदान केले. अकरानंतर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडू लागले. साडेअकरा ते दीड या वेळी २ हजार १११ जणांनी मतदान केले. दीडनंतर मतदानाचे प्रमाण काहीसे कमी झाले. दीड ते साडेतीन या वेळेत १ हजार ७६८, तर साडेतीन ते साडेपाच या वेळेत १ हजार ७०६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण २० केंद्रांवर ही मतदानप्रक्रिया पार पडली. या केंद्रावर ८० अधिकारी, २० पोलीस आणि २० कर्मचारी कार्यरत होते. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. (प्रतिनिधी)