आकाश गायकवाड व त्यांचे वडील दिलीप गायकवाड हे रात्रीच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील आतील दोन्ही बेडरूमला बाहेरून कड्या लावल्या. यावेळी घरात झोपलेल्या गायकवाड यांची आजी लताबाई यांचे तोंड दाबून धरून आजीला हातोडीने मारण्याची धमकी देत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पळ काढला .आजीने आरडाओरडा केल्याने आकाश गायकवाड हे उठले मात्र बाहेरून कड्या असल्याने ते दरवाजा तोडून बाहेरील खोलीत आले.आजीने घडलेला सर्व प्रकार सांगितला, याबाबत आकाश दिलीप गायकवाड (वय २६, रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चार जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे
ज्येष्ठ महिलेला मारहाण, सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:13 IST